सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आदिनाथ पाटील तर सचिव पदी शशील फुलारी यांची निवड

0
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आदिनाथ पाटील तर सचिव पदी शशील फुलारी यांची निवड

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आदिनाथ पाटील तर सचिव पदी शशील फुलारी यांची निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आदिनाथ पाटील तर सचिव पदी शशील फुलारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शासकीय विश्रामगृह अहमदपूर येथे काल दिनांक 4 फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या पूर्व आढावा बैठकीमध्ये वरील निवडी करण्यात आल्या. उर्वरित कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष म्हणून अजित पाटील ओम पाटील तर कार्याध्यक्ष म्हणून ऍड. किशोर कोरे व तबरेज सय्यद यांची निवड करण्यात आली कोषाध्यक्षपदी रितेश कदम व सुदर्शन पाटील तर सहसचिवपदी अजय ऊरमुंगे मोहित वारे प्रसिद्धी प्रमुख पदी संग्राम पवार नियोजन समितीच्या प्रमुख पदी गणेश हालसे तर उपप्रमुख पदी नागेश लांजे यांची निवड करण्यात आली मिरवणूक सजावट प्रमुख पदी अनिकेत काशीकर व तुकाराम लोकरे तर मिरवणूक प्रमुख पदी सुनील हालसे आकाश माने पाटील नामदेव शेळके संगम पाटील अक्षय माने पाटील यांची सदस्य पदी निवड करण्यात आली.

या बैठकीसाठी जेष्ठ सल्लागार शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रा दत्ता गलाले दिलीप जाधव प्रा विनोद माने प्रा रोहिदास कदम प्रा भीमराव नाना कदम देवानंद मुळे सतीश नवटके शिवाजी पाटील आंधोरीकर माणिक कदम जवळगेकर ऍड किरण जाधव आकाश पाटील भास्कर जाधव प्रचंडेकर विशाल जाधव परमेश्वर सूर्यवंशी शिवराज चोथवे राम पाटील तानाजी मोरे गजानन मेकले यांच्यासह शहर व तालुक्यातील शिवप्रेमींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धिरज भंडे पाटील यांनी तर आभार प्रदर्शन मुकेश पाटील यांनी केले. वरील निवडीबद्दल सर्व नवनिर्वाचित कार्यकारणी यांचा सत्कार आशा हॉटेल अहमदपूर येथे जेष्ठ नेते सांब तात्या महाजन ,कलीमोद्दीन अहमद, पांडू तात्या मिरकले ,प्रा विनोद माने ,भिमराव नाना कदम आकाश पाटील, धिरज भंडे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी भव्य रक्तदान शिबिर सर्व रोग निदान शिबिर मॅरेथॉन स्पर्धा ढोल ताशा पथक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लेझर लाईट शो भव्य मोटरसायकल रॅली व नेत्र दीपक मिरवणुकीचे सादरीकरण होणार असल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष आदिनाथ पाटील यांनी दिली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *