माऊलीचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
लातूर (प्रतिनिधी) : अंबेजोगाई रोड येथील माऊली शिक्षण प्रसारक मंडळ लातूर द्वारा संचलित माऊली बालक मंदिर, माऊली विद्यार्थी विकास केंद्र, माऊली इंटरनॅशनल मॉडेल स्कूलचे एकत्रित स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात संपन्न झाले. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन शिक्षक आमदार मा.श्री विक्रमजी काळे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शहरातील जेष्ठ उद्योजक रवींद्र अग्रवाल वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक गणेश कदम, संस्था चालक व्यंकट दापेगावकर सर ,गिरवलकर सर, श्रीराजकुमार जी मदने, श्री युवराजजी शिंदे सर, तानाजी भोसले सर, राजकुमार मगर सर ,श्री खलील शेख सर ,श्रीदेवी दास कोल्हे सर, राजकुमार जाधव सर, बाबा भिसे सर ,तसेच संस्थेचे संस्था सचिव श्री गंगाधर आरडले सर, कोषाध्यक्ष श्री तानाजी पाटील सर ,संस्थेच्या प्राचार्या सौ.कविता आरडले मँडम,उपप्राचार्या भाग्यश्री काळे सुनिता आरडले, उपस्थित होते. या स्नेहसंमेलनात भारतातील विविध उत्कृष्ट लोक नृत्याचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. या स्नेहसंमेलनात क्रीडा गट ते इयत्ता दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग होता. महाभारत नाटिका, समई नृत्य, अघोरी नृत्य, राजस्थानी चिरमी नृत्य , पंजाबी नृत्य , अशा उत्कृष्ट नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. तसेच मोबाईल नाटिका व अंधश्रद्धा निर्मूलन नाटिका याद्वारे सामाजिक संदेश देण्याचे कार्य ही स्नेहसंमेलनातून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था सचिव श्री गंगाधर आरडले सर यांनी केले. तर सूत्रसंचालन निलेश आरडले, महेश आरडले ,आरती वर्मा मॅडम , भाग्यश्री उबाळे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौरव आरडले ,व्यवस्थापक श्री गोपाळ करडिले सर, सर्व शिक्षक वृंद कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात सर्व पालक बांधव भगिनींनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली.