वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.विजय शेळके तर सचिवपदी ॲड. किरण जाधव यांची निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील विधीज्ञ असोसिएशन संघाची नूतन कार्यकारणी निवड करण्यासाठी बार चे पूर्वीचे अध्यक्ष ॲड अनिल नवटक्के यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विधीज्ञ यांची बैठक घेण्यात आली असता या बैठकीत वकील संघाच्या नुतन कार्यकारणीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ ॲड.विजय शेळके यांची तर सचिव पदी ॲड. किरण जाधव यांची सर्वानुमते आणि एकमताने निवड करण्यात आलेली आहे. यावेळी पुढील उर्वरित कार्यकारणी उपस्थित सर्व विधीज्ञ यांच्या संमतीने निवड करण्यात आलेली आहे. यावेळी विधिज्ञ मंडळाच्या उपाध्यक्षपदी ॲड .ए बी डक, सहसचिव म्हणून ॲड. ए.बी. वाघमारे तर कोषाध्यक्षपदी ॲड .जे.यू.सौदागर आणि ग्रंथपाल म्हणून ॲड.एस .ए.कांबळे यांची बहुमताने निवड करण्यात आलेली आहे. ही विधिज्ञ मंडळाची कार्यकारणीची निवड जाहीर होताच आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याबरोबरच वरील कार्यकारणी ची निवड झाल्यानंतर ॲड.भगवानराव पोळ, ॲड. हेमंतराव पाटील, ॲड.धनराज घोगरे, ॲड.किशनराव बेंडकुळे, ॲड नागेश हिप्परगेकर, ॲड.भारतभूषण क्षीरसागर, नागेश हिप्परगेकर रवी भुरकापल्ली सुरज शेळके नाथराव देवगुंडे ॲड.पंकज शेळके, ॲड,सुहास पाटील, ॲड.बालाजी जगताप, ॲड.व्हि.एस. भोसले, ॲड.सुधाकर जगताप, ॲड. स्वप्नील व्हत्ते, ॲड.विजय सोनकांबळे , ॲड.बी.जी. कोरे, ॲड.राजाराम वाघमारे, ॲड.अजय पाटील, ॲड.उद्धव जाधव, ॲड .भास्कर मुंडे, ॲड.एस .आर .केंद्रे, ॲड .गोविंद कुलकर्णी, ॲड .बसवराज कुंमदळे, ॲड.मधुबाला कराड आदींसह इतर वकील मंडळींनी आणि येथील सर्व न्यायाधीश मंडळींनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.