अहमदपूरचा आठवडी बाजार भरला थोडगा रोडला
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील आठवडी भाजीपाला बाजार पूर्वी जिल्हा परिषद च्या मैदानावर भरत होता मात्र त्या ठिकाणी सिंथेटिक वॉकिंग ट्रॅक झाल्यामुळे तो बाजार अहमदपूर नांदेड हाय वे वरती भरू लागला होता. मात्र हायवे चा रस्ता व मोठी वाहने होणारी गर्दी यामुळे त्या ठिकाणी रहदारीचा त्रासही होऊ लागला व अपघाताची शक्यता सुद्धा होती. म्हणून लोकांच्या मागणीवरून अहमदपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी नुकतेच सांगितले होते की पुढील आठवणी बाजार थोडगा रोड येथील निजवंते नगर येथे भरवण्यात येईल.
त्यानुसार आज दिनांक पाच फेब्रुवारी रोजी तालुक्यातील भाजीपाला विक्रीत्यांनी थोडगा रोड अहमदपूर येथे आठवडी भाजीपाला बाजार भरवला. मात्र थोडका रोड येथे भाजीपाला भरवण्यास काही विक्रेते व व्यापाऱ्यांनी विरोधी केला तर काही विक्रेत्यांनी समर्थांनी केले . आठवडी बाजार थोडगा रोड येथे भरल्यामुळे त्या ठिकाणी चांगलीच गर्दी झाली होती. या बाजार भरण्याच्या बाबत नगरपरिषद अहमदपूरचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्याशी बोलले असता त्यांनी या भाजीपाला बाजार भरवण्याबद्दल सर्वांचे आक्षेप व सूचना मागवल्या जातील व त्यानुसार सर्वांकष विचार करून निर्णय घेण्यात येईल असे दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.
थोडगा रोड येथे भाजीपाला आठवडी बाजार भरवण्याच्या या निर्णयाचे या रोडच्या काही व्यापाऱ्यांनी स्वागत केले आहे तर काही व्यापारी विरोधी करताना दिसले भाजीपाला विक्रेत्यांच्या प्रतिक्रिया घेतला व त्यांना विचारले असता काही विक्रेत्यांनी या ठिकाणी ग्राहक येत नसून आम्हाला आज जबरदस्ती सर्व भाजीपाला कमी किंमतीत विकावा लागत आहे असे सांगितले तर काही लोकांनी या ठिकाणी मोकळी जागा व सुटसुटीत पणा आहे असेही सांगितले त्यामुळे पुढील आठवडी बाजार कोठे भरणार हे सांगता येत नाही. याबाबतीत नगरपालिका प्रशासन व भाजीपाला विक्रेते यांच्यामध्ये चर्चा होऊनच पुढचा निर्णय होईल असे वाटत आहे