समर्थ विद्यालयात सर्वरोग निदान व उपचार शिबीर
उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सर्वरोग निदान व उपचार शिबीर घेण्यात आले. शिबीरात ३०० विद्यार्थी, शिक्षक व पालकांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.
अध्यक्षस्थानी संस्थासचिव प्राचार्य प्रमोद चौधरी उपस्थित होते. उद्घाटक म्हणून लातूर जि. प. चे माजीउपाध्यक्ष रामचंद्र तिरूके, युवा उद्योजक कमलेश पेठे, उदगीर येथील जनरल फिजिशियन डॉ. हर्षवर्धन विजयकुमार जाधव-पाटील, मधुमेह तज्ञ डॉ. प्रशांत नवटके, अस्थिरोगतज्ञ डॉ. विजय सुभाषराव बिराजदार, दंत व मुख रोग तज्ञ डॉ. कृष्णा श्रीधर नाईकवाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन रसूल पठाण यांनी केले. तर आभार अमर जाधव यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.