इंडिया महाविकासआघाडी पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्नइंडिया महाविकासआघाडी पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात इंडिया महविकास आघाडीची बैठक संपन्न झाली. बैठकीत महाविकास आघाडी एकजुटीने जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, स्थानिक प्रश्नावर येत्या १५ फेब्रुवारी रोजी “इंडिया आघाडीचा महामोर्चा” उपजिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्याचे ठरले. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित असून विद्यमान राज्य शासनाच्या वतीने तसेच केंद्र सरकारच्या वतीने जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी घोषणाबाजी केली जातेय.असाही आरोप बैठकीत करण्यात आला. यावेळी बसवराज पाटील,माजी आ.शिवराज तोंडचिरकर,सभापती शिवाजीराव हुडे,उपसभापती प्रीती भोसले,चंदन पाटील,कल्याण पाटील,शिवाजी मुळे, चंद्रकांत टेंगेटोल शिवसेना तालुकाप्रमुख,मारुती पांडे जळकोट तालुका अध्यक्ष काँग्रेस,अजित शिंदे सचिव जनता दल युनाटेड महाराष्ट्र, राजकुमार माने जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड,गजानन सताळकर शहरकार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस,अनिल पंचाक्षरी शहर प्रमुख शिवसेना,महेश धुळशेट्टे जळकोट,मंजूरखा पठाण, प्रभाकर काळे,मधुकर एकुरकेकर,उषा कांबळे, अजीम दायमी,श्रीमंत सोनाळे, प्रकाश हैबतपुरे,व्येंकटराव पाटील, आरुणाताई लेंडाणे,प्रज्ञा सूर्यवंशी, आशिष पाटील राजूरकर,रमण माने, प्रमोद पाटील,ज्ञानेश्वर पाटील,मनोज पाटील, महेश फुले,प्रदीप मोर्तळे,बाळू वडले, व्येंकट पाटील,प्रदीप पाटील, निलेश विभूते,अजय शेटकार,सुमित बेंणकुंडे, अंकुश बिरादार, फेरोज शेख, अर्जुन आटोळकर,अनिकेत काळेगोरे, श्रीनिवास एकुरकेकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. 15 फेब्रुवारी रोजीच्या मोर्चाच्या संदर्भातील निवेदन तहसीलदार मार्फत उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.