हावगीस्वामीत पुस्तक निर्मिती व प्रकाशन व्यवसायावर कार्यशाळा संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर येथे मराठी व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तक निर्मिती व प्रकाशन व्यवसाय या विषयावर प्राध्यापक व विद्यार्थ्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर होते.तर मंचावर उद्घाटक म्हणून लालबहादूर शास्त्री महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख, कवी,प्रकाशक डॉ.श्रीराम गव्हाणे ,प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रयोगशील शिक्षक व साहित्यिक शिवाजी अंबुलगेकर, उपप्राचार्य डॉ.अप्पाराव काळगापुरे, मराठी विभागाचे प्रमुख डॉ. सुशीलप्रकाश चिमोरे उपस्थित होते.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर कु.श्रद्धा नागरगोजे व कु.वैष्णवी कोटलवार यांनी स्वागतगीत सादर केले.पुस्तक माणसाचे मस्तक घडवते त्यामुळे आपण वाचलं पाहिजे. भेट म्हणून इतर वस्तू देण्यापेक्षा ग्रंथ द्यायला हव.असे सांगत कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सुशीलप्रकाश चिमोरे यांनी केले.
उद्घाटनपर मनोगतात डॉ.श्रीराम गव्हाणे म्हणाले, विद्यार्थ्यांनी अनुभवाला वाट करून द्यायला हवी. वाचन चिंतन लेखन व प्रकाशन ही एक प्रक्रिया आहे. प्रकाशन ही एक चळवळ आणि उद्योग आहे. किती लिहिलय यापेक्षा काय लिहिलय ते अधिक महत्त्वाचे असते. प्रमुख मार्गदर्शक शिवाजी अंबुलगेकर म्हणाले, पूर्वी तंत्रज्ञान इतके नव्हते, परंतु आनंद मात्र भरभरून होता. वाचनामुळे नवी दृष्टी प्राप्त होते असे सांगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर लक्ष्मीबाई टिळक यांचे संदर्भ देत वाचनसंस्कृती काळाची गरज कशी आहे, यावर त्यांनी भाष्य केले. वाचनाने माणूस समृद्ध होतो. ज्ञान, संस्कार व आत्मविश्वासाच्या दृष्टिकोनातून वाचनसंस्कृती महत्त्वाची आहे.असे उपप्राचार्य डॉ. काळगापुरे यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोपात प्र.प्राचार्य डॉ.डॉ.एन.जी.एमेकर यांनी साहित्य जगण्यातून यायला हवे. असे साहित्य वाचकांना अंतर्मुख करते व ते साहित्य दर्जेदार असते. म्हणून प्रतिभेला मेहनतीची जोड लेखकांनी द्यायला हवी असे म्हणाले. सदरील कार्यशाळेस सतेचाळीस विद्यार्थी, दहा प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. म.ई.तंगावार तर आभार ग्रंथपाल प्रा.अजित रंगदळ यांनी मानले.