किल्ल्याच्या डागडूजीसाठी तीन कोटी 77 लाख 5752 रुपये निधी मंजूर
उदगीर (एल.पी. उगिले) : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने उदगीरचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एकछत्र योजनेअंतर्गत उदगीर किल्ला हा राज्य संरक्षण स्मारकअंतर्गतच्या जतन व दुरुस्ती कामासाठी तीन कोटी 77 लक्ष 5752 रुपये रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. तो विचाराधीन होता, तो प्रस्ताव 5 फेब्रुवारी 2024 रोजी मंजूर करण्यात आला असून उदगीरच्या किल्ल्याचे जतन व दुरुस्तीच्या कामाला आणखी गती येणार आहे. यापूर्वीही मोठ्या प्रमाणात दुरुस्तीच्या कामाला ना. संजय बनसोडे यांनी निधी उपलब्ध करून दिला होता.
या निधीमुळे आणखी विकास कामाला गती मिळणार आहे. उदगीरचा किल्ला हा उदगीरच्या अस्मितेचा भाग असून या किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनासाठी निधी मिळवून दिल्याबद्दल ना. संजय बनसोडे यांचे अभिनंदन केले जात आहे.