कासार सिरसी येथील अवैध धंदे बंद करा अन्यथा आंदोलन करू निवेदनादवरे इशारा
निलंगा (बालाजी मिलगिरे) : कासार सिरसी येथील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशाप्रकारे लेखी निवेदन वंचित बहुजन आघाडी लातूरच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकसाहेबांकडे देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की कासार सिरसी येथे आवैद्य धंदेचा सुळसुट झाला असून सद्यस्थिती चालू असलेला अवैध गुटखा विक्री, जुगार, पत्ते, , मटका, व त्याच बरोबर तळीरामाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे येथील कॉलेज विद्यार्थी आणि महिला यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच अवैध धंदे वाढल्यामुळे व्यापाऱ्यांचे धंद्यावर, विद्यार्थ्यांचे, शैक्षणिक जीवनावर त्याचा परिणाम होत आहे तसेच अवैध धंदे व व्यासणामुळे कासार सिरसी येथील युवकांचे जीवन उध्वस्त होत असून व त्याच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. तरी माननीय साहेबांनी या विषयावर गंभीरतेने स्वतः लक्ष घालून अवैध धंदे बंद करण्याची तातडीने कठोर अंमलबजावणी करावी असे निवेदनात म्हंटले आहे. तसेच वरील विषयाचे अंमलबजावणी नाही झाली तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशाप्रकारे इशाराही निवेदनात दिलेले आहे. या निवेदनावर शाबुद्दीन बाबूदिन मंठाळे वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष, डॉ. घनश्याम गायकवाड जिल्हा सचिव, सद्दाम नासरजगं, कासार सिरसी शहराध्यक्ष, मोबीन लामजाने शहर उपाध्यक्ष, जुबेर नासारजगं, व अन्य कार्यकर्ते चे स्वाक्षऱ्या आहेत.