माणूस बनविण्याची कार्यशाळा म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना – मंचकराव पाटील यांचे प्रतिपादन

0
माणूस बनविण्याची कार्यशाळा म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना - मंचकराव पाटील यांचे प्रतिपादन

माणूस बनविण्याची कार्यशाळा म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना - मंचकराव पाटील यांचे प्रतिपादन

अहमदपूर (गोविंद काळे) : राष्ट्राच्या जडणघडणीत युवकांची भूमिका महत्त्वाची राहिलेली असूनअशा प्रकारच्या विशेष शिबिरातून उद्याच्या राष्ट्राच्या निर्मितीचा स्त्रोत म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, त्या युवकाची जडणघडणच अशा शिबिरातून होत असते. म्हणूनच आजच्या काळात युवकांपुढे आदर्श निर्माण करण्याची काळाची गरज आहे. हा युवकच देशाचा आधारस्तंभ आहे, हाच देशात परिवर्तन घडवू शकतो नव्हे तर क्रांती घडवून आणू शकतो. एवढी ताकद युवकांमध्ये असते, यांच्या ताकदीवरच परिवर्तनाचे चक्र अवलंबून असते. म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून विद्यार्थी घडविण्याचे कार्य होते, नव्हे तर राष्ट्रीय सेवा योजना ही तरुणांना घडवणारी व प्रेरणा देणारी कार्यशाळाच आहे . असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या बेलूर ता. अहमदपूर येथील विशेष युवक शिबिराचे उद्घाटन प्रसंंगी   सभापती मंचकराव पाटील यांनी केले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  सरपंच कमलबाई  सूर्यवंशी होत्या. तर प्रमूख पाहूणे म्हणून प्राचार्य डॉ. डी.जी माने, महेश सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती . प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. नारायण कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन  प्रा. एजाज पठाण व आभार  प्रा. डॉ. शिवराज पाटील यांनी केले.  यशस्वीतेसाठी  प्रा. डॉ. भास्कर माने, प्रा. कालिदास तपसाळे, प्रा. तुळशीदास म्हेत्रे, पवन सूर्यवंशी आदांनी परिश्रम घेतले .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *