मतदार संघातील गावात होणार ४६७ कि.मी.च्या मातोश्री ग्राम समृद्धी योजनेतुन पाणंद रस्त्यांची कामे
उदगीर (एल.पी.उगीले) : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची जिवनवाहिनी असलेल्या पाणंद रस्त्यांना मंजुरी देवून दिड ते दोन कि.मी. पर्यंतचे रस्ते व त्यांचे खडीकरण करण्यासाठी राज्य शासनाच्या नियोजन विभाग रोजगार हमी योजना मातोश्री ग्राम समृद्धी शेत / पाणंद रस्ते योजनेंतर्गंत सन २०२३-२४ या वर्षातील रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असुन मतदार संघात ४६७ किलो मीटरचे रस्ते होणार असल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे तथा परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
मातोश्री ग्रामसमृद्धी शेत / पाणंद रस्ते योजनेअंतर्गत उदगीर जळकोट तालुक्यातील विविध गावामध्ये ०.५० कि.मी., १.०० कि.मी., १.५ कि.मी., १.८० कि.मी. , २ कि.मी. , २.५० किलो मिटरचे शेत पानंद रस्ते गावांमध्ये मंजूर करण्यात आले असून यामध्ये शेत पाणंद रस्त्याची कामे पावसाळ्यात करणे अडचणीचे असते त्यामुळे त्या कामांना खरीप हंगामाच्या काढणीनंतर सुरुवात केल्यास सदर पाणंद रस्त्याचे काम न थांबता पूर्ण करता येऊ शकतात, ही बाब विचारात घेऊन ज्या ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन आपल्या गावातील शेत पानंद रस्ते पूर्ण करण्याची तयारी दाखवली आहे, अशा गावातील शेत पाणंद रस्त्यांना शासनाने मंजुरी दिली असुन यासाठी या भागाचे आमदार तथा क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी मतदार संघातील आवश्यक गावांसाठी पाठपुरावा केला होता.यामध्ये उदगीर तालुक्यातील लोणी, तोंडार, गुरधाळ, कल्लुर, एकुर्कारोड, हंगरगा कु., शंभुउमरगा, तोंडार, देऊळवाडी, अवलकोंडा, बनशेळकी, उमरगा मन्ना, सुकणी, मोर्तळवाडी, चिमाचीवाडी, डिग्रस, करडखेल, सताळा, लोहारा, सताळा बु., भाकसखेडा, देवर्जन, करखेली, दावणगाव, गुडसुर, अरसनाळ, धोंडीहिप्परगा, बेलसकरगा, वाढवणा बु., डोंगरशेळकी, करवंदी, नळगीर, अवलकोंडा, दावणगाव, शेकापुर, मोर्तळवाडी (न), तोगरी, बनशेळकी,अरसनाळ, नेत्रगाव, मल्लापुर, शेल्हाळ, नागलगाव, पिंपरी, जकनाळ, हैबतपुर, हिप्परगा डा., सुमठाणा, एकुर्का, , रुद्रवाडी, गुडसुर, सय्यदपुर, तिवटग्याळ, रावणगाव, मलकापूर, भाकसखेडा, कोदळी, एकुर्कारोड, नागलगाव, धडकनाळ, कुमदाळ हेर, हिप्परगा डा., डाऊळ, गुडसुर, तोगरी, खेर्डा, हकनकवाडी, रावणगाव,शेकापुरवाडी, कल्लुर, इस्मालपुर, हिप्परगा डा., डाऊळ हि., डाऊळ, गंगापुर, देवर्जन, टाकळी, कुमदाळ (हेर), हंगरगा कु., बनशेळकी, बोरगाव, धोंडिहिप्परगा, कोदळी, वाढवणा खु., गुडसुर, जकनाळ, हकनकवाडी, खेर्डा, जानापुर, हंडरगुळी, कल्लुर, तादलापुर, हाळी, देऊळवाडी, चोंडी, चिमाचीवाडी, देवर्जन रोड, नागलगाव, शेकापुर, वाढवणा खु., कल्लुर, शिरोळ, कासराळ, आदी तर जळकोट तालुक्यातील कोळनुर, मेवापुर, अतनुर, माळहिप्परगा, धामणगाव, सोरगा, गुत्ती, लाळी बु., मंगरूळ, फकरु तांडा, चतरु तांडा, घोणसी, सोनवळा, बोरगाव, येवरी, सुल्लाळी, मंगरूळ, जगळपुर, जळकोट, हळद वाढवणा, होकर्णा, शिवाजीनगर तांडा, चिंचोली, गुत्ती, वांजरवाडा, येलदरा, डोमगाव, लाळी बु., उमरगा रे., बोरगाव, तिरुका, मरसांगवी, शिवाजीनगर, तिरुका, उमरगा रेतु, केकतसिंदगी, उमरदरा, चेरा, गुत्ती, पाटोदा बु., जंगमवाडी, जिरगा, शेलदरा, हळदवाढवणा, रावणकोळा, हावरगा, चेरा, गुत्ती, वांजरवाडी हा., धामणगाव, सुल्लाळी, येवरी, अतनुर, मंगरुळ, होकर्णा, आदी गावामध्ये शासनाच्या नियोजन विभागातुन सदर पाणंद रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे.
मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत उदगीर व जळकोट तालुक्यातील पाणंद रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. या पाणंद रस्त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेताकडे जाण्यासाठी सोईचे होईल आणि शेतातील मालवाहतूक करण्यासाठी मदत होणार असल्यामुळे उदगीर व जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.