लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेतील घवघवीत यश

0
लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेतील घवघवीत यश

लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेतील घवघवीत यश

उदगीर (एल.पी.उगीले) : प्रज्ञा भूगोल परीक्षा, नवी मुंबई अंतर्गत घेण्यात आलेल्या भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा-2023 मधे लालबहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले.आठवी ते दहावी गटातील एकूण- 197 विद्यार्थी परीक्षेस बसले होते.यापैकी 161 विद्यार्थी विशिष्ट श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.विद्यालयातून सर्वप्रथम व सुवर्णपदक प्राप्त कु. श्रेया सुनील कुलकर्णी –
सर्व द्वितीय व रोप्य पदक प्राप्त चि.कमलापुरे संकेत संजय,सर्व तृतीय व कांस्यपदक प्राप्त चि. केंद्रे पार्थ सुनील, कु.तनुजा उमाकांत स्वामी या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश प्राप्त केले आहे. तसेच मुख्याध्यापकांनी सन्मानपत्र तर भूगोल शिक्षिका डॉ.श्रद्धा पाटील यांना 2023चा उपक्रमशील भूगोल शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना भूगोल शिक्षक मनोज भांडे, तानाजी खोकले , छाया दिक्कतवार यांनी मार्गदर्शन केले.
विद्यालयाच्या या यशाबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्रजी अलूरकर, कार्यवाह डॉ. हेमंतजी वैद्य, भाशिप्र संस्थेच्या केंद्रीय कार्यकारी समितीचे सदस्य तथा लाबशा शैक्षणिक संकुलाच्या स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह शंकरराव लासुणे, लाबशा शैक्षणिक संकुलाच्या स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार , लाबशा माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष सतनप्पा हुरदळे, मुख्याध्यापक अंबादास गायकवाड, उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक लालासाहेब गुळभिले, कृष्णा मारावार व माधव मठवाले ,भूगोल विषय प्रमुख सौ दिक्कतवार व सर्व भूगोल विषय शिक्षक, शिक्षकवृंद सर्वानी यशस्वी विद्यार्थी व विद्यालयाचे अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!