वजनमापे विभागाने मापात पाप केले; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांचा कायमचाच हिशोब केला?
लातूर (कैलास साळुंके) : नौकरी मग ती कोणतीही असो, आपण त्या कामाशी किती प्रामाणिक राहातोय आपल्या कामावर किती प्रेम करतो दिसून येते. लातूर जिल्ह्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस उपअधिक्षक म्हणून माणिक बेद्रे रुजू झाले. एखाद्या प्रामाणिक अधिकारी काय करू शकतो? याचे उत्कृष्ट उदाहरणच त्यांनी दाखवून दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सक्रीय केला. लाचखोरावर लगाम घालण्यासाठी आणि लाचखोर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी एकापाठोपाठ एक धाडी टाकायला सुरुवात केली. त्यासोबत सर्वात महत्वाचे काम जर त्यांनी केले असेल तर ते म्हणजे जनमाणसात लाचखोरांना कसे पकडायचे. लाच म्हणजे काय? लाच मागण्याच्या व्यक्तिच्याविरोध तक्रार कशी नोंदवायची? तक्रार दिल्यानंतर धाड पडली म्हणून आपले काम थांबत नाही अशी प्रामाणिक गोष्टींची जनतेला माहिती दिली. जनजागृती केली. त्याचबरोबर आपल्याकडे ज्या म्हणून तक्रारी आल्या त्यासंदर्भात अत्यंत गोपनीयता पाळून धाडी टाकल्या. याचा परिणाम असा झाला की जनतेमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांच्याविषयी विश्वास निर्माण झाला असल्याने जनता लाचखोरांच्या विरोधात तक्रार देण्यास पुढे येत आहेत अशीच एक कारवाई आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आली सविस्तर माहित अशी की आरोपी १. जनार्धन नागोराव ताटे वय ५९ वर्षे, व्यवसाय वजने मापे दुरुस्ती परवाना धारक रा. सिकंदरपुर ता. जि. लातूर २. हणमंत शामराव कदम वय ५४ वर्षे, पद-शिपाई वर्ग-४, नेमणुक वनज व मापे विभाग औसा जि. लातूर या दोघांनी लाचेची मागणी करुन आरोपी क्रमांक १ यांनी शासकीय फी १०००/- रुपये व्यतिरीक्त ८००/ रुपयांची लाच स्विकारली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.
यातील तक्रारदार यांचे ३० किलो वजनाचा ईलेक्टीक वनज काटा प्रमाणित करून देण्यासाठी १,००० /- रुपये शासकीय फी व्यतिरीक्त १,०००/- रुपये लाचेची मागणी केली बाबतची तकार दिनांक २३/०६/२०२१ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे प्राप्त झाली होती. तकारदार यांचे तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर यांच्याकडून दिनांक २३/०६/२०२१ रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता, तकारदार यांचे ३० किलो वजनाचा ईलेक्ट्रीक वनज काटा प्रमाणित करुन देण्यासाठी शासकीय फी १,०००/- रुपये व शासकीय फी व्यतिरीक्त आणखीन १,०००/- रुपये असे म्हणुन लाचेची मागणी करून त्यांनी त्यांचा संबंधीत दुसरा कर्मचारी कदम यांना त्यांच्या फोनवरुन फोन करुन लाउडस्पीकर ऑन करुन तक्रारदार यांना बोलण्यासाठी दिला असता संबंधीत लोकसेवक हणमंत कदम, शिपाई यांनी फोनवरुन तक्रारदार यांचेकडे त्यांच्या वर नमुद कामासाठी शासकीय फी चे १,०००/- रुपये शासकीय फी व्यतिरीक्त आणखीन ८००/- रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.
सदर लाचेची रक्कम वजनमापे परवाना धारक जनार्धन ताटे यांना देण्यासाठी कासार बालकुंदा ग्रामपंचायत कार्यालया समोर तकारदार गेले असता वजनमापे परवाना धारक जनार्धन ताटे यांनी तक्रारदार यांचेकडुन शासकीय फी व्यतिरीक्त ८००/- रुपये लाचेची रक्कम १३.५१ वाजता स्वतः स्विकारली असल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले. गुन्हाचा तपास पोलीस निरीक्षक कुमार दराडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर हे करीत आहेत. सदरची सापळा कार्यवाही श्रीमती कल्पना बारवकर, पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्र, नांदेड, श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांचे मार्गदर्शना खाली पोलीस उप अधिक्षक माणीक बेद्रे, पोलीस निरीक्षक कुमार दराडे, बाबासाहेब काकडे, सपोउपनि संजय पस्तापुरे, पोह/ रमाकांत चाटे, लक्ष्मीकांत देशमुख, चंद्रकांत डांगे, पोना/ मोहन सुरवसे, मपोना/ शिवकांता शेळके, संतोष गिरी, शिवशंकर कच्छवे, आशिष क्षीरसागर, संदीप जाधव, दिपक कलवले, मपोशि रुपाली भोसले, चापोना / राजु महाजन यांनी पार पाडली आहे.