जिल्हा परिषद शाळा, नागतिर्थवाडी येथे आरोग्य तपासणी शिबिर
उदगीर (एल.पी.उगीले) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागतिर्थवाडी येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत तालुका आरोग्य यंत्रणेमार्फत शाळेतील विद्यार्थ्यांची व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली, त्याच बरोबर मुलांना लठ्ठपणा , मधुमेह, दृष्टीदोष व जंत नाशक गोळ्यांचे महत्व सांगण्यात आले ,मुलांना दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे, पूरक आहार याचे महत्व व हात धुण्याचे प्रात्याक्षिक करून दाखवण्यात आले.
यावेळी आरोग्य विभाग प्राथमिक आरोग्य केंद्र नागराळ येथील वैद्यकीय अधिकारी बिलाला मिर्जा , आरोग्य पर्यवेक्षक हरिशचंद्र गायकवाड, आरोग्य सेविका वर्षा सुरसे, लॅब टेक्निशियन सुर्यवंशी , अमोल रोटटे यांच्या सह गावचे माजी सरपंच राज गुणाले, सहशिक्षिका अमरजा शिरुरे व गावातील नागरिक उपस्थित होते.