नागतिर्थवाडी येथे प्लास्टिक मुक्ती जनजागरण रॅली
उदगीर (एल.पी.उगीले) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागतिर्थवाडी यांच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत प्लास्टिक मुक्ती जनजागरण रॅली काढण्यात आली. या रॅली मधून शालेय विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावात फिरून प्लास्टिक किती घातक आहे? दैनंदिन जीवनात प्लास्टिक वापर कसा टाळावा? पर्यायी व्यवस्था म्हणून प्लास्टिक ऐवजी इतर कोणकोणत्या वस्तू वापराव्यात? असलेले प्लास्टिक जतन करून त्याचा पुर्नवापर करन्यासाठी द्यावा, हे समजावून सांगत गावभर घोषणा देवून जनजागृती केली. या वेळी गावच्या सरपंच कोमल गुणाले, माजी सरपंच राज गुणाले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर कोंबडे,अंगणवाडी शिक्षिका पंचफुला गुणाले, शाळेच्या सहशिक्षिका अमरजा शिरुरे व गावातील नागरिक उपस्थित होते.