कासार शिरसी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेवरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी परिसरात किमान दोन ठिकाणी शाखा उघडण्याची चेअरमन मिलगिरे यांची मागणी
कासार सिरसी (बालाजी मिलगिरे) : कासार सिरसी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अंतर्गत कासार शिरसी शहरासह एकूण 12 सोसायटी व पाच वाड्या व वस्त्यांचा व्यवहार चालतो यात या भागातील खातेदार अपंग निराधार विधवा लाभार्थ्यांनाही येथूनच मानधन वितरित केले जाते शिवाय कृषी सन्मान योजना पिक विमा सह सर्व शेतकऱ्यांना सुद्धा याच शाखेतून अनुदान दिले जाते त्यामुळे साहजिकच या बँकेवर लाभार्थ्यांची नित्य झुंबड दिसून येते यामुळे या शाखेत ज्येष्ठ नागरिक अपंग वृद्ध महिलांची तारांबळ उडत असते व बँक कर्मचाऱ्यावर त्यांच्या कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे खातेदारांची गैरसोय व बँकेवरचा अतिरिक्त ताण विचारात घेऊन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यकारीने या परिसरात हरी जवळगा सह अन्य एका ठिकाणी कुठे तरी दोन शाखा काढाव्यात अशी मागणी येथील वि का सेवा सोसायटीचे चेअरमन गुरुनाथ आप्पा मिलगिरे यांनी केली आहे कासार शिरसी परिसरात ६८ गावात या शाखेच्या केवळ कासार शिरशीसह मदनसुरी कासार बालकुंदा व कोकळगाव अशा चार ठिकाणीच शाखा आहेत जनतेची मागणी विचारात घेऊन बँक प्रशासनाने हासोरी किंवा हरी जवळगा येथे नव्याने शाखा स्थापन केली तर या अंतर्गत हासोरी खुर्द शाबितवाडी उस्तुरी टाकळी अशा गावांचा समावेश शक्य आहे व ते सोयीचे ठरणार आहे हासोरी किंवा हरिजवळगा येथे बँकेची शाखा व्हावी ही चेअरमन गुरुनाथ आप्पा मिलगिरे यांची मागणी रास्त असून त्यांच्या मागणीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे