शिक्षण हा महिला सक्षमीकरणाचा प्रमुख आधारस्तंभ – मा. श्री. गोविंदरावजी भोपणीकर साहेब
देवणी : शिक्षण हा महिला सक्षमीकरणाचा प्रमुख आधारस्तंभ असून शिक्षणाने माणसाला विवेकबुद्धी जागृत होते आणि शिक्षणातून महिला सक्षमीकरणाची सुरुवात होते असे प्रतिपादन मा.श्री. गोविंदराव भोपणीकर साहेब (अध्यक्ष, जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान, भोपणी) यांनी केले. कै. रसिका महाविद्यालयातील युवती कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या महिला सशक्तीकरण व सबलीकरण या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून अनिता येलमटे, महिला उद्योजक अर्चनाताई पैके यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास माहविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे, उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के यांची उपस्थिती होती. यावेळी प्रा. अंकुश भुसावळे यांनी “बचतीचे महत्त्व” या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवती कल्याण मंडळ प्रमुख प्रा. डॉ. एस. एस. डेंगाळे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. वैशाली चटगे यांनी केले. आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील युवतीसह देवणी तालुक्यातील महिला शिक्षिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.