कविता म्हणजे समूहाचे गाणे असेते – सुप्रसिद्ध कवी प्रभाकर साळेगावकर

0
कविता म्हणजे समूहाचे गाणे असेते - सुप्रसिद्ध कवी प्रभाकर साळेगावकर

कविता म्हणजे समूहाचे गाणे असेते - सुप्रसिद्ध कवी प्रभाकर साळेगावकर

अहमदपूर (गोविंद काळे) : कविता म्हणजे समूहाचे गाणे असते , कवी समाजभावना, समाजचिंतनच आपल्या कवितेतून व्यक्त करत असतो याबरोबरच कवी समाजाला दिशाही देण्याचे काम करतो व गरज पडल्यास टिकाही करतो असे प्रतिपादन माजलगाव येथील सुप्रसिद्ध कवी प्रभाकर साळेगावकर यांनी अहमदपूर येथे रोटरी क्लब तर्फे आयोजित “क कवितेचा” या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदावून बोलताना व्यक्त केले या कवी संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन कवी राजेसाहेब कदम यांनी केले तर प्रास्ताविक शिवशंकर पाटील यांनी व आभार महेंद्र खंडागळे यांनी मानले.

तब्बल तीन तास महाराष्ट्रातील नामवंत कवींनी ही मैफिल गाजवली यामध्ये आंबेजोगाई चे गझलकार मुकुंद राजपंखे, परळीचे अरुण पवार, किनगाव चे बालाजी मुंडे, अहमदपूरचे अनिल चवळे व रंजना गायकवाड यांनी सहभाग नोंदवत आपल्या विविध अंगी कवितांनी रसिकांना खिळवून ठेवले

कवी अरुण पवार यांनी आपली “गावाकडे चला याचा अर्थ काय बापू “ही कविता सादर करत उपस्थित त्यांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले.
गझलकार मुकुंद राजपंखे यांनी “घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे” ही आपली गझल सादर करताना परिवर्तन स्वीकारला पाहिजे असा संदेश दिला.
कवयित्री रंजना गायकवाड यांनी “बाई पण खास बाई, बाई पण खास “ही कविता सादर करताना आपल्या गोड आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले
कवी बालाजी मुंडे यांनी स्त्रीभ्रूणहत्येवर प्रहार करताना “आता तरी देवा तुला जाग येऊ दे” ही कविता सादर करून स्त्रीभ्रूणहत्येवर प्रहार केला व स्त्री जन्मदर घटत असल्याचे सांगत आत्मचिंतन करण्यास भाग पाडले.
कवी अनिल चवळे यांनी “माथ्यावर आमच्या सावली घेऊन चालायची माय आमची” ही आई वरील कविता सादर करतान उपस्थितांना त्यांना भावनिक केले ‌.
सूत्रसंचालक राजेसाहेब कदम यांनी” सांग ना यार काय होतो आपलं नातं “ही कविता सादर करून टाळ्या च टाळ्या मिळवल्या.
अध्यक्षीय समारोप करताना कवी प्रभाकर साळेगावकर यांनी “बळ दे जगायला” ही सर्व कल्याणाची प्रार्थना सादर करत कवी संमेलनाचा समारोप केला
तब्बल तीन तास या रंगलेल्या मैफिली ला अहमदपूर येथील जाणकार प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
यावेळी रोटरीचे अध्यक्ष शिवशंकर पाटील सचिव श्रीराम कलमे, डॉ.नंदकुमार गुणाले संजय गोटमवाइ, डॉ .चंद्रकांत उगिले, डॉ विष्णू पदातुरे, मोहीब कादरी , डॉ .पांडुरंग कदम महेंद्र खंडागळे गुरुनाथ चवळे धनजंय कोत्तावार राहुल घाटोळ डॉक्टर शिवप्रकाश हिंगणे
डॉ. अंजली उगिले, सौ संगिता खंडागळे,प्रा. वर्षाराणी पाटील यांच्यासह इनरव्हील अध्यक्ष शितल मालू व अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा रवी पुणे ,गंगाधर याचवाड पांडुरंग पाटील ,राजकुमार बिराजदार ,कपिल बिरादार अनिल फुलारी मनोज आरदवाड राहुल घाटोळ , श्रिधर लोहारे ,आदी सह रोटरीच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *