कुमठा येथे टेनिस बॉल खुल्या क्रिकेट स्पर्धां संपन्न

0
कुमठा येथे टेनिस बॉल खुल्या क्रिकेट स्पर्धां संपन्न

कुमठा येथे टेनिस बॉल खुल्या क्रिकेट स्पर्धां संपन्न

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर तालुक्यातील मौजे कुमठा खुर्द येथे प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही टेनिस बॉल च्या खुल्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सुनील भाऊ केंद्रे यांच्या पुढाकारातून आणि अतुल केंद्रे व कुमठा मित्र मंडळ परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी लातूर आणि नांदेड जिल्ह्यातून जवळपास 50 संघांनी आपला सहभाग नोंदवलेला. अत्यंत रोमांचकारी सामना संपन्न झाला. अखेरचा सामना फ्रेंडशिप क्रिकेट क्लब कुमठा खुर्द व अंश राजे क्रिकेट क्लब उदगीर यांच्यामध्ये खेळला गेला. ज्यामध्ये अंश राजे क्रिकेट क्लब उदगीर संघाने चुरशीच्या लढतीत हा अंतिम सामना जिंकला. या सामन्यासाठी प्रथम पारितोषक 51 हजार रुपये सुनील भाऊ केंद्रे यांच्यातर्फे तर द्वितीय पारितोषक 25 हजार रुपये संतोष भाऊ हरमुंजे यांच्यातर्फे तसेच तृतीय पारितोषिक अकरा हजार रुपयांचे आयपीएस अधिकारी हरेश्वर स्वामी यांच्या वतीने व चतुर्थ पारितोषक पाच हजार रुपये हकनाकवाडीचे अभियंता प्रमोद केंद्रे यांच्यातर्फे ठेवण्यात आले होते. तसेच मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर असेही विविध पारितोषिक देऊन खेळाडूंना प्रोत्साहित करण्यात आले. या संपूर्ण स्पर्धा मध्ये पंच म्हणून सलीम आत्तार व भरत जाधव यांनी काम पाहिले. त्यांना अतुल भाऊ केंद्रे व त्यांच्या मित्र परिवाराने सहकार्य केले. या स्पर्धा यशस्वी झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या संघाला प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ पारितोषक वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पक्षाचे युवा नेते सचिन शिवाजीराव हुडे, शिवशंकर धुपे, रंगराव पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व भास्करराव पाटील, दत्ताभाऊ केंद्रे, युवा उद्योजक महेश्वर स्वामी, जयराज कापसे, हनुमंत पवार, कुमठा गावचे उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील, तसेच गावचे पोलीस पाटील राजकुमार मोमले इत्यादी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी राजाभाऊ बिरादार, रामदास जाधव, माधव बिरादार, तय्यब शेख, तुकाराम घुगे, सतीश फड, बाळासाहेब घुगे, चंद्रकांत जाधव, केशव जाधव, दीपक जाधव, तुका नाना केंद्रे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुळशीराम जाधव यांनी तर आभार प्रदर्शन अतुल केंद्रे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *