खंडीखेरी येथे प्रभू यल्लालिंग मुत्या महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न…
देवणी (लक्ष्मण रणदिवे) : तीन राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्नाटकातील औराद बाऱ्हाळी तालुक्यातील खंडीखेरी येथे गुरुवारी प्रभू श्री यल्लालिंग मुत्या महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्य विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभू यल्लालिंग महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून यज्ञ सोहळा संपन्न झाला. यावेळी श्री शंकर लिंग शिवाचार्य महाराज हाणेगाव, श्री बसवलिंग शिवाचार्य महाराज कवळास, श्री शिवलिंग शिवाचार्य महाराज हेडगापूर, श्री मच्छिंद्रनाथ अप्पाजी अवधतपूर, श्री अमृत मुत्या महाराज, पिराजी महाराज भवानी बिजलगावकर, श्री शिवानंद शिवाचार्य महाराज खंडीखेरी यांचे आशीर्वचन पार पडले.
यानिमित्त सकाळपासूनच भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बुधवारी संध्याकाळी शिव अवतार प्रभू यल्लालिंग मुत्या महाराज यांच्या प्रतिमेची व पादुकांची भव्य पालखी मिरवणूक शिव मल्हार येळकोट येळकोट घे, अशा जयघोषात ढोल ताशाच्या गजरात हनुमान मंदिर ते यल्लालिंग मठ देवस्थान पर्यंत पालखी मिरवणूक संपन्न झाली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी खंडीखेरी मठाचे मठाधिपती शिवानंद शिवाचार्य महाराज यांची पाद्य पूजा करण्यात आली.या सोहळ्यास गजानन हिरेमठ सोमनाथ स्वामी महाडीवाले, माजी सभापती बालाजी बिरादार, चंद्रशेखर महाजन, त्रिमुख स्वामी, कपिल स्वामी, विरय्या स्वामी, नंदकिशोर स्वामी, प्रा. कोंडीबा बोमनाळे, राम गजभार, कार्तिक स्वामी, ओमकार स्वामी, शिवा स्वामी लादा यांच्यासह महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, तेलंगणा राज्यातील भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.