आठवडी बाजारात पॉकेट मारणाऱ्या बीड मधील आरोपीला मुद्देमालासह अटक

0
आठवडी बाजारात पॉकेट मारणाऱ्या बीड मधील आरोपीला मुद्देमालासह अटक

आठवडी बाजारात पॉकेट मारणाऱ्या बीड मधील आरोपीला मुद्देमालासह अटक

लातूर (एल.पी.उगीले) : ज्या ठिकाणी आपली कोणती माहिती नाही अशा ठिकाणी जाऊन पाकीटमगिरी चोऱ्या करण्याची प्रवृत्ती काही चोरांची असते. नवीन ठिकाणी आपल्याला कोणी ओळखत नसल्यामुळे किंवा पोलिसांच्या रेकॉर्डवर आपले कोणतेही नाव नसल्यामुळे चोरटे बिनधास्त असतात. मात्र लातूर पोलिसांनी वेळोवेळी आपले कसब दाखवत पर जिल्ह्यात येऊन चोऱ्या पाकिटमध्ये करणाऱ्या आरोपींना हिसका दाखवला आहे.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, गर्दीचा फायदा घेऊन बसस्थानकावर व आठवडी बाजारात लोकांच्या खिशा मधील पैसे चोरणाऱ्या आरोपींना पोलीस ठाणे मुरुड च्या पथक कडून ताब्यात घेण्यात आले आहे. मुरुड येथे आठवडी बाजार असल्याकारणाने पंचक्रोशीतील व्यापारी व नागरिक मोठ्या प्रमाणात मुरुड शहरात येतात. त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी होते. याचाच फायदा घेऊन जिल्ह्याबाहेरील गुन्हेगार गुन्हे करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी शहरात येतात. हीच बाब हेरून पोलीस ठाणे मुरुड चे सहायक पोलीस निरीक्षक व्यंकटेश अलेवार यांनी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांचे पथक तयार करून आठवडी बाजार व बसस्थानक परिसरात साध्या पोशाखात कर्तबगार पोलीस तैनात करण्यात आले होते.
सदर पथके गर्दीतील गुन्हेगारावर लक्ष ठेवून होते.तेव्हा एका इसमाच्या हालचालीवर संशय आल्याने पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव प्रवीण अनिल जाधव, (वय 22 वर्ष, राहणार खोकरमोहा, तालुका शिरूर जिल्हा बीड. सध्या राहणार गांधीनगर, बीड) असे असल्याचे सांगितले.
ज्या नागरिकाच्या खिशातून सदरचे पाकीट काढण्यात आले होते, त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नमूद आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात नमूद आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे मुरुडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांचे नेतृत्वात पोलिस अमलदार तिगीले, सूर्यवंशी, रवी कांबळे, अनिल शिंदे, खोपे, राठोड, माने, हादबे, आत्राम बोईनवाड, महेश पवार यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *