मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कव्हा येथे आमरण उपोषण
लातूर (प्रतिनिधी) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे व जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी कव्हा येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
लातूर तालुक्यातील कव्हा येथे दि. 11 फेब्रुवारी रोजी मराठा समाजातील तरुण उपोषणकर्ते अड नारायण चंद्रकांत कव्हेकर हे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषणास बसले आहेत. कव्हा गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व ‘एक मराठा….लाख मराठा”, ‘एकच मिशन…मराठा आरक्षण’ घोषणा देत आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठायोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.