पोलीस निरीक्षक संजीवन मिरकलेचा धुमधडाका!!

0
पोलीस निरीक्षक संजीवन मिरकलेचा धुमधडाका!!

पोलीस निरीक्षक संजीवन मिरकलेचा धुमधडाका!!

घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगाराला 8 लाख रुपयाचे दागिने व रोख रक्कमेच्या मुद्देमालासह अटक. घरफोडीचे 9 गुन्हे उघड.

लातूर (एल.पी.उगीले) लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला आपल्या उत्कृष्ट तपासाने नावलौकिक मिळवून देणाऱ्या पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने पुन्हा उत्कृष्ट कामगिरी करत, घरफोडीचे नऊ गुन्हे उघड केले आहेत. या गुन्ह्यात गेलेले दागिने आणि मुद्देमाल असा एकूण आठ लाखाचा ऐवज या पथकाने जप्त केला आहे, तसेच या प्रकरणातील अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे. याबाबत थोडक्यात माहिती की, लातूर जिल्ह्यातील वेग-वेगळ्या पोलीस ठाणे हद्दी मध्ये रात्रीच्यावेळी राहते घराचा कडी-कोंडा तोडून घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यावरून जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनला घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
सदरचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेशित केले होते. त्यावरून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथके तयार करून त्यांना सखोल मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या होत्या.
सदर पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना मोठ्या प्रमाणात बातमीदार नेमून तसेच तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेण्यात येत होते. वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदरच्या पथकांनी केलेल्या परिश्रमामुळे पथकांना गुप्त बातमीदाराकडून घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती मिळाली.
घरफोडीतील गुन्हेगार त्याने चोरलेला सोन्याचा मुद्देमाल विकण्यासाठी अहमदपूर बसस्थानक परिसरात फिरत आहे, अशी माहिती मिळाली. सदर माहितीची खातरजमा करून सदरचे पथक तात्काळ अहमदपूर येथे रवाना करण्यात आले. सदर पथकाने अहमदपूर येथे पोहोचून बस स्थानक परिसरात फिरत असलेल्या संशयित आरोपीला ताब्यात घेतले.
सदर पथकांनी अतिशय कुशलतेने सापळा लावून घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला दिनांक 12/02/2024 रोजी ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव छोटा मोहन बापुराव भोसले, (वय 34 वर्ष राहणार कुरुळा, तालुका कंधार, जिल्हा नांदेड) असे असल्याचे सांगितले.
त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये सोन्याचे वेगवेगळे दागिने दिसून आले. त्याबाबत त्याच्याकडे विचारले तेव्हा त्याने त्याच्या इतर आणखीन पाच साथीदारासह मिळून लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडीचे गुन्हे केल्याचे व त्या गुन्ह्यामध्ये चोरलेला, त्याच्या हिश्याला आलेले सोन्याचा दागिन्याचा मुद्देमाल व रोख रक्कम असल्याचे कबूल केले.
लातूर जिल्ह्यात घडलेल्या घोरफोडीच्या गुन्ह्याच्या अभिलेखाची पाहणी केली असता नमूद आरोपीनी पोलीस ठाणे शहाजानी औराद, पोलीस ठाणे औसा, पोलीस ठाणे निलंगा, पोलीस ठाणे किल्लारी, पोलीस ठाणे देवणी, पोलीस ठाणे कासार शिरशी, पोलीस ठाणे शिरूर अनंतपाळ येथे एकूण 9 घरफोडी चे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
त्यावरून नमूद आरोपीस त्याने चोरलेल्या 124 ग्राम सोन्याचे दागिने व 22,000/- हजार रुपये रोख असा 08 लाख 03 हजार रुपयाच्या मुद्देमालासह पुढील कारवाई करिता पोलीस ठाणे औराद शहाजानी यांचे ताब्यात देण्यात आले आहे. असून त्याच्या सोबत असलेल्या फरार आरोपी साथीदाराचा शोध सुरू आहे.
वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस पथकांनी अतिशय उत्कृष्टरित्या तपास करून बंद घराचे कुलूप तोडून, घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्या कडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, पोलीस अमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, मोहन सुरवसे, राजेश कंचे, रामभाऊ मस्के, तुराब पठाण, जमीर शेख, संतोष खांडेकर, नकुल पाटील यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *