कै. रसिका महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन
देवणी (प्रतिनिधी) : कै. रसिका महाविद्यालय, देवणी आणि निलया फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. प्रो. चेतन गोडबोले (पुणे) यांनी विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्याना करिअरच्या विविध संधी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे उपस्थित होते. यावेळी निलया फाऊंडेशन चे साईनाथ ढगे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. गोपाल सोमाणी, प्रा. ए. एस. पठाण यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ.शिवाजी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा डॉ. गोपाल सोमाणी यांनी केले तर प्रा. अंकुश भुसावळे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.