येणाऱ्या काळातील राजकीय आखाड्यात विरोधकांना चितपट करणार – आ रमेशआप्पा कराड
लातूर (एल.पी.उगीले) आगामी काळातील राजकीय फडात आपण बाजी मारणार असा आत्मविश्वास विधान परिषद सदस्य तथा भाजपचे नेते रमेश आप्पा कराड यांनी व्यक्त केला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रेणापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या नमो केसरी स्पर्धेत रामेश्वर येथील भरत कराड विजेता ठरला. भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते चांदीची गदा आणि 51 हजार रुपयांचे पारितोषक देऊन भरत कराड यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात नमो चषक 2024 अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील यशस्वी संघांना आणि खेळाडूंना पारितोषिक वितरण करण्यात आले. नमो केसरी कुस्ती स्पर्धा रेणापूर येथे रंगबेरंगी लाईटच्या प्रकाश झोतात झाली. मराठवाड्यात पहिल्यांदाच तीन फूट उंचीवर झालेल्या कुस्ती स्पर्धेचे अत्यंत दर्जेदार आणि देखने नियोजन भाजपाचे युवा नेते ऋषीकेशदादा कराड यांनी केले होते. रामेश्वर येथील भरत कराड आणि नेकनूर येथील आकिब शेख यांच्यात अखेरची रंगतदार कुस्ती झाली. यात भरत कराड यांनी बाजी मारत विजयाचा मानकरी ठरला. दरम्यान या कुस्तीच्या आखाड्यात लहान, मोठ्या एकूण सव्वा पाच लाख रुपये बक्षिसाच्या अनेक कुस्त्या झाल्या. या कुस्त्या पाहण्यासाठी हजारोचा जनसमुदाय उपस्थित होता.
कुस्ती स्पर्धेबरोबरच लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने घेण्यात आलेल्या क्रिकेट, कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, कॅरम यासह विविध खेळातील विजेते मुले आणि मुली यांच्या संघांना हजारो रुपयांच्या पारितोषकासह स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड, जिल्ह्याचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने घवघवीत यश संपादन केले, या संघातील लातूर ग्रामीणची कन्या ऋतुजा उरगुंडे हिचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, भाजयुमोचे प्रदेश सचिव ऋषिकेशदादा कराड, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव भागवत सोट, ज्येष्ठ मार्गदर्शक तुळशीरामअण्णा कराड, प्रगतशील शेतकरी काशीराम नाना कराड, जिल्हा सरचिटणीस महेंद्र गोडभरले, पंचायत राज सेलचे जिल्हा संयोजक नवनाथ भोसले, भाजपाचे रेणापूर तालुकाध्यक्ष अॅड दशरथ सरवदे, लातूर तालुकाध्यक्ष बन्सी भिसे, जिल्हा भाजपाचे अनिल भिसे, सतीश आंबेकर, हनुमंतबापू नागटिळक, गोविंद नरहरे, गंगासिंह कदम, संगायो समितीचे अध्यक्ष वसंत करमोडे, रेणापूरचे प्रथम नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, महिला आघाडीच्या अनुसया फड सुरेखा पुरी शीला आचार्य भाजयुमोचे सुरज शिंदे, अमर चव्हाण, संजय ठाकूर, अच्युत कातळे, संतोष राठोड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना भाजपा नेते आ रमेशआप्पा कराड म्हणाले की, ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे त्यांच्या गुणांना वाव मिळावा यासाठी नमो चषक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून लातूर ग्रामीण मतदार संघातील 77 हजार खेळाडूंनी खेळासाठी नोंदणी करून राज्यातील 288 मतदार संघात नव्या क्रमांकावर आहे अनेक संघाने सहभाग नोंदवून चांगली कामगिरी करून दाखवली यशस्वी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून कुस्तीसह सर्वच स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन करून यशस्वी केल्याबद्दल भाजयुमो कार्यकर्तेचे कौतुक केले.
भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनेची आणि यशस्वी कामगिरीची माहिती देऊन नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मताधिक्य वाढवावे मेहनत करावी असे सांगून आ रमेशआप्पा कराड म्हणाले की, 2019 मध्ये लातूर ग्रामीण मतदार संघात पैशाच्या जोरावर विजय मिळवला असला तरीदेशात एक नंबरचे नोटाला मतदान मिळाल्याने नोटाच्या विरोधात निवडून आलो असे सांगण्याची त्यांच्यात हिंमत नाही . जी माणसं एसीत बसून बंद दारामध्ये राजकारण करतात, त्याला सर्वसामान्य जनता आता वैतागली आहे. विधान भवनात मागच्या दाराने जायचे नाही ही कार्यकर्त्याची इच्छा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात होणाऱ्या राजकीय आखाड्यात जाऊन, कुस्तीच्या फडामध्ये जाऊन कुस्ती खेळायची आणि चितपट करून कुस्ती जिंकायचीच. कार्यकर्त्याच्या इच्छेसाठी मी ही रात्रंदिवस काम करतोय, असेही त्यांनी बोलून दाखविले.
केंद्र शासनाच्या विविध योजनांची आणि विकास कामाची माहिती देऊन खा सुधाकर शृंगारे यावेळी बोलताना म्हणाले की अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू प्रमाणे ऋषिकेश तरुणातील ऊर्जा वाढविण्याचे काम करत आहेत. कुणीही काहीही विकास कामे केली तर मी केलंय, मी केलंय असे सांगण्याचा विरोधक प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांना कोणता रस्ता कोणत्या गावाला जातो, हे तरी माहित आहे का? असा प्रश्न उपस्थित केला.
या कार्यक्रमात युवा नेते ऋषिकेश दादा कराड यांचे तडाखेबाज भाषण झाले. त्यांच्या भाषणाला उपस्थितानी मोठी दाद दिली. 2019 साली लातूर ग्रामीण मतदारसंघात नूरा कुस्ती झाली, फडात व्हायला हवी होती. असे सांगून आम्हा सर्वांची इच्छा आहे, या मतदार विरोधकाची पाठ लावलीच पाहिजे. पावसाचे संकट आल्यावर प्रभू श्रीकृष्णाने करंगळी लावून गोवर्धन उचलला त्याप्रमाणे मतदार संघावर काहीजणाचं आलेलं संकट घालविण्यासाठी आप्पा, तुम्ही करंगळी लावाच आणि गोवर्धन उचलाच. तुम्ही सांगाल ते धोरण, तुम्ही लावाल ते तोरण, याप्रमाणे युवा मोर्चाचे कार्यकर्ते जिद्दीने कामाला लागले आहेत, असेही ऋषिकेश कराड यांनी बोलून दाखवले.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड दशरथ सरवदे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले. शेवटी अमर चव्हाण यांनी उपस्थित यांचे आभार मानले.
यावेळी भाजपाचे शरद दरेकर, सुकेश भंडारे, प्रताप पाटील, श्रीकृष्ण जाधव, भैरवनाथ पिसाळ, श्रीकृष्ण पवार, माधव घुले, शरद राऊतराव, लक्ष्मण नागिमे, श्रीमंत नागरगोजे, दत्ता सरवदे, उत्तम चव्हाण, भागवत गीते, राजाभाऊ आलापुरे, विजय चव्हाण, उज्वल कांबळे, अशोक सावंत, सुरेश गुड्डे, नरेश चपटे, पंकज काळे, चंद्रकांत माने, दत्ता आंबेकर, लहूराजे सव्वाशे, विठ्ठल कस्पटे, अविनाश रणदिवे, राजकुमार नाडे, दीपक पवार, भाऊसाहेब गुळबिले, बाजीराव साखरे, बापूराव बिडवे, रमेश कटके, शुभम खोसे, रमेश चव्हाण, मनोज चक्रे, लखन आवळे, अंतराम चव्हाण, गणेश चव्हाण, किरण मुंडे, सूरत सूर्यवंशी, अक्षय भोसले, ओम चप्पल, अनिकेत बुड्डे, दिलीप चोथवे, गोपाळ पवार, भारत पवार, हरिदास कराड, विकास सरवदे, सिद्धेश्वर मामडगे, सचिन लटपटे, हनुमंत गव्हाणे, हनुमंत साळुंखे, हाजी शेख, राजेश काळे, वाजिद पटेल, दिलीप चव्हाण गुणवंत जोगदंड, राज जाधव, विजय मोठेगावकर, बाळू पाटील, संदीप संपत्ते, आनिम शेख, गणेश माळेगावकर, सुरज फुलारी, श्रीराम राऊतराव, इकबाल मासूमदार, जयराम जाधव, मच्छिंद्र चक्रे, नवनाथ पांचाळ, राजेश कांबळे, दत्ता जाधव, सचिन लटपटे मुकेश शिंदे यांच्यासह भाजपाच्या प्रमुखासह भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते क्रीडाप्रेमी नागरिक खेळाडू हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.