अहमदपूरात जिजाऊ-सावित्री व्याख्यानमालेचे आयोजन
अहमदपूर (गोविंद काळे) : मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, व सर्व परिवर्तनवादी संघटना अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदपूरमध्ये जिजाऊ सावित्री व्याख्यानमालेचे आयोजन संस्कृती मंगल कार्यालय, अहमदपूर येथे वेळ : सायं. ६.०० वाजता करण्यात आले आहे.
या विषयीची सविस्तर माहिती अशी की, अहमदपूर येथील मराठा सेवा संघ व समविचारी संघटनाच्या वतीने गेल्या १७ वर्षापासून जिजाऊ सावित्री व्याख्यानमालेचे यशस्वी आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते व्याख्यानासाठी निमंत्रीत करण्यात आले. या १८ व्या वर्षाच्या व्याख्यानमालेसाठी दि.२१ फेब्रुवारी रोजी विषयः मिडीया आमचा; आवाज कुणाचा ? वक्ते : शर्मिष्ठा भोसले ( पत्रकार-मुंबई ), दि. २२ फेब्रुवारी रोजी विषयः आयुष्यातील आनंदाच्या वाटा विनोदी वक्ते डॉ. संजय कळमकर (अहमदनगर ) व दि.२३ फेब्रुवारी रोजी विषय : स्वयंघोषीत देशभक्तांचे वास्तव वक्ते : चंद्रकांत झटाले (लेखक, पत्रकार व निर्भिड वक्ते, अकोला) आदी मान्यवर वरील विविध विषयावर तीन दिवस पुष्प गुंफणार आहेत. तरी या व्याख्यानमालेचा शहरासह तालुक्यातील व्याख्यान प्रेमी सुजान नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.