शिवछत्रपती महाराजांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा – प्राचार्य गजानन शिंदे
अहमदपूर (गोविंद काळे) : शालेय आणि महाविद्यालयीन युवकांनी मोबाईल, व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यामध्ये व्यस्त न राहता अभ्यासासोबत, शिवछत्रपती महाराज यांच्या जीवन चरित्राचा चिकित्सकपणे अभ्यास केल्याने आपल्या जीवनाला सकारात्मक दिशा मिळते असे आग्रही प्रतिपादन प्राचार्य गजानन शिंदे यांनी केले. ती दि. 19 रोजी यशवंत विद्यालयाच्या प्रांगणामध्ये शिवजयंतीच्या महोत्सवामध्ये मार्गदर्शन प्रसंगी बोलताना व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. मुजमिल सय्यद, उप मुख्याध्यापक राजकुमार गोटे, पर्यवेक्षक राम तत्तापुरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी प्राचार्य गजानन शिंदे यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राजकुमार गोटे प्रा मुजमील सय्यद यांची मनोगत पर भाषण झाले. प्रास्ताविक पर्यवेक्षक राम तत्तापूरे यांनी सूत्रसंचालन के डी बिराजदार यांनी तर आभार राजकुमार पाटील यांनी मानले.