कमालनगर येथे छत्रपती शिवाजीमहाराज जयंतीनिमित्त आयोजित भव्य रक्तदान, मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबीर
उदगीर (एल.पी.उगीले) : सीमाभागातील कमालनगर तालुका येथे शिवजयंती निमित्ताने भव्य रक्तदान, मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबीर उत्साहात संपन्न झाले. तसेच कमालनगर येथे शिवचरित्र वाचन सप्ताह चे सुध्दा आयोजन करण्यात आले होते. युवकांमध्ये समाजाप्रती आत्मियता वाढावी व सामाजिक बांधिलकी जपली जावी, या उद्देशातून
रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. तसेच वाढत्या ताणतणावाच्या जीवनशैलीत लोकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून त्याबद्दल त्यांची जागरूकता वाढावी म्हणून रक्तदाब व मधुमेह तपासणी सुध्दा आयोजित करण्यात आली होती. यासाठी उदगीर येथील मधूर डायबिटीज सेंटर चे डाॅ. प्रशांत नवटक्के यांनी सेवा बजावली. गेल्या चार वर्षापासून शिवजयंती निमित्त कमालनगर येथील शिवभक्त वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रमातून शिवजंयत्ती साजरी करतात.शिवचरीत्र वाचन, शैक्षणिक, सामाजिक इ.विविध उपक्रम राबितात सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या कार्याचे शिवभक्त कृतीतून दर्शन घडवतात. या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीपराव हूनुसनाळे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अंकुश लक्ष्मणराव वाडीकर, स्वप्निल फुलारे, नवीन शृंगारे, प्रकाश चांगुने, प्रदीप बिरादार, राजीव जाधव, विनोद चांगुने, सुरेश चांगुने, शिवाजी धडकनाळे, बालाजी जाधव, प्रशांत तलवाडे मकरंद चांगुने दत्ता चांगुने मनोज सुतार, जितू देशमुख, गुलाब कांबळे, आदेश धुडूकनाळे, शुभम हुरुस्नाळे, नागेश हुरसनाळे, अर्जुन वाळवाले इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव लांचेकर यांनी केले प्रस्ताविक समितीचे सचिव योगेश हुरुसनाळे यांनी तर आभार प्रदर्शन समितीचे अध्यक्ष सचिन जाधव यांनी मानले.