बारावी बोर्ड परीक्षा सुरळीत होण्यासाठी अहमदपूर तालुक्यात यंत्रणा सज्ज गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा आज दि.२१ फेब्रुवारी पासून सुरूवात होत आहे. अहमदपूर परिसरात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ बोर्ड परीक्षा )केंद्रावर सुरळीत होण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
एच.एस.सी.बोर्ड परीक्षा सुराळीत पार पडण्यासाठी केंद्रप्रमुखांना योग्य ती सूचना बैठकीत देण्यात आली.परिरक्षक कार्यालय,गट साधन केंद्र अंतर्गत तालुक्यातील परीक्षा केंद्रावर परिरक्षक कार्यालयांतर्गत ३५९१ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहे.
सदरील परीक्षा महात्मा गांधी काँलेज ४१० विद्यार्थी,महात्मा फुले ज्यू.काँलेज ३९५ विद्यार्थी, यशवंत ज्यू काँलेज २६४विद्यार्थी,कस्तुरबा गांधी ज्यु.काँलेज १९० विद्यार्थी,पोस्ट बेसिक आश्रम शाळा ढाळेगाव २८२विद्यार्थी,गोरटे आश्रम शाळा तुळशीराम तांडा ३७० विद्यार्थी वरील केद्रावर परीक्षा देतील.या ६ मुख्य केंद्रावर १९११
विद्यार्थी परीक्षार्थी आहेत.
परिरक्षक क्र.(२३८) अहमदपूर येथिल मुख्य परिरक्षक गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे,उप.परिरक्षक रमाकांत बिलापट्टे ,सह सहाय्यक परिरक्षक (रनर) म्हणून रमेश चेपुर, सुधीर भोसले,शिवाजी घटकर केंद्रे विवेक,मुंडे कृष्णा,गुंजोटे सर
किनकर सोमनाथ,मंगेश कासले प्रा.शेळके.UID लावणार सय्यद इकबाल अहेमद,सेवक एम.एम.पठाण सह परीक्षा सुरळीत होण्यासाठी योग्य पद्धतीने नियोजन केले आहे.
यावेळी प्रत्यक्ष परीक्षा सुरु असताना संबंधित परीक्षा केंद्रावर काही गैर प्रकार घडत असल्यास बैठे पथक, सहायक परिरक्षक (रनर) यांनी इमारतीच्या परीसराचे व परीक्षा दालनाच्या बाहेरील परीसरांचे आवश्यकतेनुसार व्हिडीओ चित्रिकरण करण्यासाठीचे सक्त सूचना दिले गेले आहेत.बाहेरच्या परीसरातून परीक्षा केंद्रावर काही गैरप्रकार घडत असेल तर तात्काळ कार्यवाहीसाठी क्षेत्रीय अधिकारी,विभागीय सचिवांना अवगत करण्यात येणार आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथक आणि महिलांचे विशेष पथक परीक्षा केंद्रावर तैनात केले आहे.