विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखुन भविष्याचा मार्ग निवडावा – प्रा. आनंद जंगले
अहमदपूर (गोविंद काळे) : दहावी नंतर यशस्वी होण्यासाठी नजर ध्येयावर तर पाय जमिनीवर असणे गरजेचे असुन विद्यार्थ्यांनी स्वताच्या क्षमता ओळखुण योग्य तो मार्ग निवडावा असे आग्रही प्रतिपादन यशवंत कोटा पॅटर्न तर्फे आयोजित दहाविच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी इग्रंजी विषयाचे शिक्षक प्रा. आनंद जंगले यांनी केले.
दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे औचित्य साधुन यशवंत कोटा पॅटर्न तर्फे दहाविच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व भविष्यातिल करिअरचे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन कोटा पॅटर्न चे कार्यवाहक श्री. शेख सर तर प्रमुख पाहुणे म्हणुन सायन्स कॉलेज नांदेडचे प्रा.डॉ. मयुर सरांसह अन्य मान्यवर उपस्थीत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शेख सरांनी पुष्पहार अर्पण करुन वंदन केल्यावर कार्यक्रमाची सुरवात झाली.
यावेळी पुढे बोलताना प्रा.आनंद सरांनी, विद्यार्थ्यांनी आई – वडिलांचे स्वप्न पुर्ण करण्यास प्राणपणाने झटले पाहीजे, न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने संकटांना सामोरे गेले पाहीजे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन इयत्ता ९वी ची विद्यार्थीनी कु. स्नेहा भिकाणे यांनी केले. दहाविच्या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन करुन नववीतुन दहावित जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शालेय अभ्यासक्रमा सोबतच एन.सी.आर.टी. चा अभ्यास क्रमाचे महत्त्व सांगितले. शेलापागोटे व इतर मनोरंजन कार्यक्रमा नंतर राजेश काकडे सरांनी आभार व्यक्त करित कार्यक्रमाची सांगता केली.