मंगळसूत्र, गंठण चोरणाऱ्या अट्टल आरोपीला स्थानिक गुन्हे शाखे कडून अटक

0
मंगळसूत्र, गंठण चोरणाऱ्या अट्टल आरोपीला स्थानिक गुन्हे शाखे कडून अटक

मंगळसूत्र, गंठण चोरणाऱ्या अट्टल आरोपीला स्थानिक गुन्हे शाखे कडून अटक

लातूर (एल.पी.उगीले) : मंगळसूत्र, गंठण, चोरणाऱ्या गुन्ह्यातील आरोपीला अटक. सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल, कार असा एकूण 19 लाख 94 हजार रुपयांचा 280 ग्रॅम वजनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या धडाकेबाज मोहिमेमुळे मंगळसूत्र आणि गंठण चोरीचे 16 गुन्हे उघड झाले आहेत. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी झाली आहे.

याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या चोरी व चैन स्नॅचिंग चे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी,अमलदारांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकामार्फत जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते.

आरोपीचा शोध घेण्यासाठी सदर पथक रात्रंदिवस परिश्रम घेत होते. तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती. दरम्यान 21/02/2024 विशेष पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहिती वरून चोरलेले सोन्याचे दागिने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला गूळमार्केट परिसरातून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव सौदागर उर्फ विशाल मोहन रसाळ, (वय 32 वर्ष, रा. महादेवनगर, खंडापुर सद्या राहणार भामरीचौक,लातूर) असे असल्याचे सांगितले.

नमूद आरोपीला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने सांगितले की, तो मागील काही वर्षापासून लातूर शहरातील रियाझ कॉलनी, पद्मा नगर, शारदा नगर, विशाल नगर, भाग्य नगर, अवंती नगर इतर विविध ठिकाणाहून रस्त्या वरून एकटी पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण हिसका मारून,चोरून मोटार सायकल वरून निघून जाण्याचे गुन्हे केल्याचे कबूल केले.
त्यावरून लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे अभिलेखाची माहिती घेतली असता पोलीस ठाणे शिवाजी नगर, व पोलीस ठाणे एमआयडीसी येथील मंगळसूत्र चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले आहेत. नमूद आरोपीने वर नमूद गुन्हा पैकी 16 गुन्ह्यातील चोरलेला सोन्याचे 280 ग्रॅम वजनाचे 16 मंगळसूत्रे, गंठण व विविध दागिने काढून दिल्याने ते जप्त करण्यात आले आहे. इतर गुन्ह्यातील दागिने विकून खरेदी केलेली एक कार व मोटार सायकल असा एकूण 19,94,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक, वेंकटेश पल्लेवाड, प्रवीण राठोड, सपोउपनी बेल्लाळे, पोलीस अमलदार युवराज गिरी, अर्जुन राजपूत, मुन्ना मदने, खुर्रम काझी, रवि गोंदकर , दीनानाथ देवकते, यशपाल कांबळे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, प्रदीप स्वामी, सायबर सेल चे संतोष देवडे, गणेश साठे यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!