देवणी पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची तिसरी घटना

0
देवणी पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची तिसरी घटना

देवणी पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची तिसरी घटना

उदगीर (एल पी उगिले) : देवणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गेल्या दीड महिन्यात लहान मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वलांडी येथील प्रकरणाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेध नोंदवला गेला, ती घटना ताजी असतानाच पुन्हा दुसरी घटना घडली आणि 20 फेब्रुवारी रोजी पुन्हा तिसरी घटना घडली आहे. ही विनयभंगाची मालिका पोलीस प्रशासनासाठी चांगलीच डोकेदुखी ठरली आहे. या संदर्भात पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, दिनांक 20 फेब्रुवारी मध्यरात्री आरोपी सोहेल मिर्झा (रा. देवणी) यांनी फिर्यादीच्या घरी जाऊन अल्पवयीन मुलीचा हात वाईट हेतूने धरला आणि स्त्री मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून देवणी पोलीस स्टेशन येथे 22 फेब्रुवारी दुपारी भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 354 (ब ),8 अन्वये तसेच पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक एम ए डोके हे करत आहेत. ही विनयभंगाची मालिका देवणी परिसरात संताप व्यक्त करणारी ठरत आहे. तसेच पोलीस प्रशासनाचा वचक कमी झाल्याचे बोलले जात आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी समाज माध्यमावर केली जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *