मंथन पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील विकास नगर मधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या मंथन पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन येथील विशाल फंक्शन हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे हे होते. तर व्यासपीठावर तहसीलदार राम बोरगावकर, अभिजित औटे, बाळासाहेब मरलापल्ले, केंद्रप्रमुख बालाजी धमनसुरे, दिपाली औटे, माधवराव अंकुशे, संचालक सोमनाथ अंकुशे, ज्योती अंकुशे ,प्राचार्या सुवर्णा पटवारी यांची उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या सुवर्णा पटवारी यांनी केले.याप्रसंगी दिपाली औटे, तहसीलदार राम बोरगावकर, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले व पालकांच्या मनोरंजनासाठी स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये प्राधान्याने संगीत खुर्ची, बलून गेम ,रेसिपी कॉम्पिटिशन ,वन मिनिट शो,.या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आले.त्यानंतर विद्यार्थ्यानी राज्यातील विविध संस्कृतीची ओळख होण्यासाठी विविध राज्याचे गीत सादर करण्यात आले. त्याचबरोबर प्रत्येक राज्याची संस्कृतीचे महत्त्व व नृत्य, गायन, सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रतीक्षा लोहकरे यांनी केले तर प्रमिता शेळके यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गर्दी झाली होती.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका सोनाली अंकुशे, शुभांगी टेकाळे, प्रमिता शेळके, रेखा पाटील, आसमा सय्यद, साक्षी केंद्रे , सुनिता गोंड व भाग्यश्री मावशी यांनी परिश्रम घेतले.