जलसंधारणाची कामे वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर जिल्ह्याची मोठी समस्या असून या जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी नागरिकांना जलसंधारणाची अधिकाधिक कामे करावीत अशी सूचना केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केली. ते डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज भक्ती स्थळ येथे रस्त्याच्या लोकार्पण व भूमिपूजन समारंभात बोलत होते.आज आपण हेलीकॉप्टरने येत असताना पाहिलं कि सर्व नद्या कोरड्या आहेत. तिथे पाणी अडविण्याचे काम व्हायला हवे होते. लातूर जिल्ह्यात सर्वाधीक मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आहेत. या कारखाना व्यवस्थापनाने धावणाऱ्या पाण्याला, चालायला, चालणाऱ्या पाण्याला थांबायला आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीत मुरायला भाग पाडले पाहिजे. कारखानदारी यशस्वीतेसाठी जलसंधारणाची कामे करणे महत्वाची आहेत. गावागावात- घराघरात पाणी आडवावे पाणी जिरवून पातळी वाढवा. आमदार, खासदारांनी प्रथम पसंती पाण्याला द्या. जलसाधारणाच्या कामाकडे विशेष लक्ष द्या. राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले. या कामातून आमच्या विभागाने १८.७२ क्यूबीक मीटर पाणी स्टोरेज होईल असे काम केले आहे. रस्ते झाले, भांडवली गुंतवणूक झाली आता नदी पात्रात पाणी राहिले, विहिरीला पाणी वाढले तरच रोजगार वाढतील अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्ह्यातील आमदार खासदारांनी पहिले प्राधान्य पाणी प्रश्नाला द्यावे. जलसंवर्धनाकडे लक्ष द्या.अशी सूचना केली.लातूर-टेंभूर्णी रस्ता लवकरच यावेळी गडकरी भाषण करित असताना कोणीतरी लातूर- टेंभूर्णी रस्त्याची आठवण करून दिली. तेंव्हा त्यांनी या रस्त्याविषयी बोलायलाही मला लाज वाटतेय असे सांगून या कामात काहिंनी घाण केली होती. पण ह्या
रस्त्याच्या कामासंदर्भातील अडचणी दूर होत असून या कामास आपण मंजूरी देत असून लवकरच हे काम पूर्ण होईल, असे ना. गडकरी यांनी सांगितले.
…….
शेतकरी ऊर्जादाता बनला पाहिले
…….
शेतकरी जसा अन्नदाता आहे तसा तो ऊर्जादाता बनला पाहिजे. साखर कारखान्यांनी इथेनॉल, हवाई इंधन बनवावे त्यासाठी प्रचंड मागणी आहे. तसे झाले तर शेतकऱ्यांच्या हातात पैसा येईल. साखर कारखान्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात इथेनॉलचे पंप टाकावेत असे आवाहन केले. या कार्यक्रमास क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार सुधाकर श्रृंगारे, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, आ. बाबासाहेब पाटील, आ. रमेश आप्पा कराड, आ. अभिमन्यू पवार, आ. रत्नाकर गुट्टे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर ,भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख ,भाजपा प्रवक्ते गणेश हाके, माजी आमदार बबन खंदाडे माजी आ. सुधाकर भालेराव, माजी आ. गोविंद केंद्रे ,आचार्य गुरुराज स्वामी महाराज, मनोहर धोंडगे, माजी सभापती भारत चामे, मा. जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे ,माजी पंचायत समिती सभापती अयोध्या ताई केंद्रे, माजी नगराध्यक्ष अश्विनीताई कासनाळे यांची उपस्थिती होती.