शासकीय माध्यमिक आश्रमशाळा राईनपाडा येथे पारितोषक वितरण सोहळा संपन्न

0
शासकीय माध्यमिक आश्रमशाळा राईनपाडा येथे पारितोषक वितरण सोहळा संपन्न

शासकीय माध्यमिक आश्रमशाळा राईनपाडा येथे पारितोषक वितरण सोहळा संपन्न

धुळे (लक्ष्मण कांबळे) : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका अंतर्गत येणाऱ्या राईनपाडा येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण सोहळा व विविध कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. तसेच याच कार्यक्रमात शबरी विद्यार्थी बँक,आय.सी.टी. लॅबचे उद्घाटन व दहावी विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. प्रमोद पाटील प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पी.के.ठाकरे सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण,मनोज पाटील सहाय्यक प्रकल्प अधिकारी विकास,भटू आव्हाड शिक्षण विस्तार अधिकारी, सतीश काकड शिक्षण विस्तार अधिकारी धुळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी लेझीम पथक, झांज पथकने स्वागत करण्यात आले.यावेळी शबरी विद्यार्थिनी बँकचे उद्घाटन मुलींच्या वस्तीगृहात व शालेय इमारतीत आय.सी.टी.लॅबचे उद्घाटन व आश्रमशाळेचा सातवीचा विद्यार्थी प्रदीप जालीम मावळी याने राईनपाडा आश्रमशाळेची प्रतिकृती रेखाटलेली होती.त्याचे अनावरण प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी फिरते वाचनालय, डिजिटल क्लासरूम,वाचनालय वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, राज्यस्तरीय प्राविण्य प्राप्त खेळाडूंचा सत्कार,आश्रम शाळेत वर्षभर सर्वात जास्त दिवस उपस्थित असलेले विद्यार्थी पहिली ते दहावी यांचा सत्कार व बक्षीस वितरण तसेच आश्रमशाळेत हरवलेल्या वस्तू प्रामाणिकपणे परत करणारे विद्यार्थी यांचा सत्कार व सन्मान करून विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली.आदर्श शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.शाळेत व सहशालेय उपक्रमातील सहभागी होणारे व प्राविण्य मिळवणारे गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार व वार्षिक बक्षीस वितरण करण्यात आले. दहावीच्या विद्यार्थ्यीनींनी गीत गायन करून निरोप दिला.या वर्षाचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्रदीप जालीम मावळीला देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुभाष जाधव यांनी केले. सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष जाधव मुख्याध्यापक यांच्यासह विजय खैरनार,मनोज निकम, चंद्रकांत साळुंखे, पन्नालाल पाटील, सोनी सूर्यवंशी, कल्पना बागुल,महालू गांगुर्डे, कैलास बागुल,अशोक कूवर, अनिल चौरे,जागृती वसावे,महेश जुकले, बंका बहिरम, विजय बागुल,प्रवीण कुवर, प्रितम पिंपळे,यशवंत गावित,निलेश गवळी,उषा अहिरे,मिना गवळी, विजया देसाई,पुष्पा चौधरी आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय खैरनार यांनी केले तर आभार महाळू गांगुर्डे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *