सुकणी येथील स्वा.सावरकर मा.विद्यालयात स्वयंशासन दिन
उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील सुकळी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून स्वयंशासन दिन घेण्यात आला. अतिशय उत्साहामध्ये, विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये हा स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला.एक दिवस संपूर्ण शाळा चालविण्याची जबाबदारी इयत्ता दहावी वर्गातील विद्यार्थांना सोपविण्यात आली.या मागचा हेतू असा होता की,विद्यार्थ्यांना अध्यापन करीत असताना शिक्षकांविषयीचे खुप आकर्षण असते.व आदर असतो. आपणही एक दिवस शिक्षक व्हावे,अशी विद्यार्थ्यांची इच्छा असते.पण भविष्यामध्ये ही संधी प्रत्येक विद्यार्थ्यांला मिळेलच असे नाही.याची जाणीव ठेवून स्वा.सावरकर मा.विद्यालयाने अतिशय उत्साहात स्वयंशासन दिन साजरा केला.या मध्ये द्वितीय सराव परीक्षेतून गुणानुक्रमे प्रथम आलेली विद्यार्थीनी कु.आवलकोंडे अनुजा दत्तात्रय हिला मुख्याध्यापिका होण्याचा मान देण्यात आला.शिक्षकाच्या भूमिकेत कु.सुकणे अक्षता, सुकणे गायत्री, मुळे वैशाली,मुळे हर्षद, शहाजी,सुकणे आदर्श, मदने यश,नरेश, गोटमुकले ऋषिकेश, सुमितने सेवकांचे काम पाहिले. या सर्वाचे कौतूक संस्थेचे सचिव सुनिल सुकणे, मुख्याध्यापिका सौ.सुकणे मिरा,तसेच शिक्षकवृंद कांबळे ,मुळे ,इंचूरे , गंगोत्री,डोईफोडे, गव्हाणे व गोणपाट यांनी अभिनंदन केले.