उदगिरात सोमवारी निखिल वागळे यांची जाहीर सभा,नितिन वैद्य व जयदेव डोळे यांची उपस्थिती
उदगीर (एल.पी.उगीले) : देशात आणि राज्यात सध्या हुकुमशाही पद्धतिने राज्य कारभार चालत आहे. त्यामुळे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जात आहे. चाललेल्या राज्य कारभाराविरोधात नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची सोमवार रोजी सायंकाळी ६ वाजता नगरपरिषदेच्या मैदानावर, निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नितीन वैद्य व जयदेव डोळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सध्या देशात घाणेरडे राजकारण सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे मुलभूत अधिकार धोक्यात आले आहेत. संविधानाची मनमानी पद्धतीने तोडफोड केली जात आहे. देशातील लोकशाही धोक्यात आली असून संसदेमध्ये अनेक लोकशाहीविरोधी कायदे संमत केले जात आहेत. सरकारी यंत्रनेचा गैरवापर करुन अनेकांना तुरुगात टाकले जात आहे. यामुळे जनतेच्या मनात राग आहे. सर्वसामान्य नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत, यासाठी ‘निर्भय बनो’ अभियानांतर्गत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राजकीय व सामाजिक प्रबोधन होण्यासाठी पुरोगामी विचारांच्या लोकांनी, समविचारी पक्ष, व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन अजित शिंदे, गजानन सातळकर, आशिष पाटील, अहमद सरवर, फिरोज देशमुख, ओमकार गांजूरे , बाबुराव माशाळकर, शंकर मोरे यांनी केले आहे.