नवदुर्गा सेवाभावी संस्थेच्या वतीने दंतरोग तपासणी शिबिर संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : नवदुर्गा सेवाभावी संस्था भोई गल्ली उदगीरच्या वतीने संत गाडगे बाबा जयंती निमित्त हावगी स्वामी चौकातील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयात शालेय विद्यार्थ्यासाठी दंत रोग तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ दंत रोग तज्ञ डॉ.गोविंद सोनकांबळे व डॉ.विजयकुमार करपे यांचे हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले.त्यानंतर डॉ.गोविंद सोनकांबळे यांनी दाताची काळजी कशी घ्यावी? याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.त्यानंतर डॉ.गोविंद सोनकांबळे, डॉ.विजयकुमार करपे, डॉ.गजानन तीपराळे, डॉ.विक्रम माने, डॉ.नरेंद्र जाधव, डॉ.वसंत बलांडे, डॉ.संदीप सोनटक्के, डॉ.गिरीश येरोळकर, डॉ. कैलास मालशेटवार, डॉ.शीतल पाटील, डॉ.आश्लेषा मुंडे या तज्ञ डॉक्टरांनी शाळेतील जवळपास ३५० विद्यार्थ्यांची दंत रोग तपासणी करून उपचार करण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा कुलकर्णी व आशा मॅडम यांनी सहकार्य केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवदुर्गा सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा मीरा अनंतवाळ, सचिव सुनीता अनंतवाळ, राधाबाई हिवरे, रंजनाबाई हिवरे, संगीता अनंतवाळ, वर्षा रंगवाळ, चंचला रंगवाळ, सुरेखा अनंतवाळ, निर्मलाबाई हिवरे, अरुणाबाई हिवरे, शीला रंगवाळ, शकुंतला उकंडे, सपना उकंडे यांनी परिश्रम घेतले.