संकेत भोसलेंच्या कुटुंबीयांची भीम आर्मीने भेट घेतली,घाटकोपर ते राजभवन पैदल मार्च काढणार

0
संकेत भोसलेंच्या कुटुंबीयांची भीम आर्मीने भेट घेतली,घाटकोपर ते राजभवन पैदल मार्च काढणार

संकेत भोसलेंच्या कुटुंबीयांची भीम आर्मीने भेट घेतली,घाटकोपर ते राजभवन पैदल मार्च काढणार

मुंबई (प्रतिनिधी) : किरकोळ कारणावरून खून झालेल्या भिवंडीतील संकेत भोसले यांच्या कुटुंबीयांची भीम आर्मीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली . सदर खून प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर या प्रकरणाला न्याय देण्यासाठी येत्या ४ मार्च रोजी घाटकोपर ते राजभवन असा पैदल मार्च काढणार असल्याची घोषणा भीम आर्मीच्या वतीने करण्यात आली.
व्यवसायाने रिक्षाचालक असलेले भिवंडी येथील सुनील भोसले यांचा सोळा वर्षीय मुलगा संकेत हा तेथील बीएनएन महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होता .दिनांक १४ फेब्रुवारी रोजी याच महाविद्यालयात शिकणाऱ्या देवा धोत्रे याचे संकेत आणि त्याच्या मिंत्रांसोबत किरकोळ कारणास्तव भांडण झाले. याचा राग येऊन देवा यांने आपले वडील शिवसेना शिंदे गटाचे विभागप्रमुख कैलास धोत्रे यांना या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यासह संकेतला वराळ देवी चौकात गाठून त्याला मारहाण केली. तेथून त्याला साठे नगर या ठिकाणी नेवून जाणीवपूर्वक नशा करण्यास भाग पाडले आणि पुन्हा मारहाण केली. या मारहाणीत त्याला अंजूर फाटा नाक्यावर एका रिक्षात टाकून नेण्यात आल्याचे संकेतच्या नातेवाईकांनी सांगितले .
सकाळी महाविद्यालयात गेलेला संकेत घरी न आल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली असता, त्यांना तो एका रिक्षामध्ये बेशुद्धावस्थेत सापडला. नातेवाइकानानी त्याला मुंबईच्या रुग्णालयात दाखल केले. असता २१ फेब्रुवारी रोजी संकेतचा मृत्यू झाला. या प्रकरणी भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी १७ पैकी नऊ आरोपींना अद्याप पर्यंत अटक केली असून उर्वरित आरोपी फरार आहेत. आरोपींनी वापरलेल्या दोन गाड्या, दोन बाईक, दोन खुर्च्या आणि ज्या दगडांनी मारहाण केली ते दगड देखील पोलिसांनी जप्त केले आहेत. दरम्यान भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भीम आर्मीचे मुंबई अध्यक्ष अविनाश गारुड,तुषार कदम , वकील महेंद्र भिंगारदिवे,ठाणे जिल्हा मीडिया प्रभारी जयेश मोहिते,ठाणे जिल्हा उपाध्यक्ष दामोदर काकडे,डोंबिवली शहर अध्यक्ष,राहुल मेहता,व डोंबिवली शहर अध्यक्ष संतोष सेल्वराज आदी पदाधिकाऱ्यानी संकेत भोसले यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व सविस्तर चर्चा केली.या दुर्दैवी घटनेत भीम आर्मी तुमच्यासोबत असल्याची ग्वाही यावेळी शिष्टमंडळाने दिली.शिवाय शिष्टमंडळाने निजामपूर पोलीस ठाणे येथे जाऊन या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेत,उर्वरित आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली .
दरम्यान मृत संकेत भोसलेंच्या कुटुंबियांना ५० लाखांचे आर्थिक सहाय्य्य करावे, हा खटला विशेष न्यायालयात चालविण्यात यावा,परिवारातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी,भोसले कुटुंबाला पोलीस सुरक्षा द्यावी, दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोसले कुटुंबीयांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट करावी. अशा मागण्या भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी केल्या आहेत. सदर मागण्यासाठी घाटकोपर रमाबाई कॉलनी ते राजभवन असा आंबेडकरी समाजाच्या वतीने पैदल मार्च काढून राज्यपालांकडे न्याय मागण्यात येईल, अशी माहिती कांबळे यांनी दिली आहे. या मार्च मध्ये लोकशाही मानणाऱ्या सर्वांनी सहभागी व्हावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *