शिवाजी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : शिवाजी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला . कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो . यानिमित्ताने कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ ए एम नवले यांच्या हस्ते करण्यात आले. कवी कुसुमाग्रजांच्या जीवनावर डोळा नवले यांनी प्रकाश टाकताना म्हटले, कुसुमाग्रज यांनी साहित्य क्षेत्रामध्ये खूप मोठे योगदान दिलेले आहे. त्याबद्दल त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ आर एम मांजरे,प्रा.डॉ नरसिंग कदम, प्रा.डॉ. विष्णू पवार,डॉ. यु के सिरशी, प्रबंधक बी के पाटील,लाडके आर, देवनाळे कार्यालयीन कर्मचारी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रतिमेचे पूजन केले. हा कार्यक्रम मराठी विभाग व जयंती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंती समिती प्रमुख डॉ एस व्ही शिंदे यांनी तर आभार जयंती समिती सदस्य डॉ सी जे देशमुख यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.