भक्ती स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध केंद्रीय मंत्री नामदार भागवत कराड यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे कार्य मी अत्यंत जवळून पाहिले असून त्यांचे समाधी स्थळ देशात मोठे व्हावे यासाठी शासन स्तराच्या वतीने तालुक्याचा एक भूमिपुत्र या नात्याने भक्ती स्थळाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नामदार भागवतराव कराड यांनी केले.
ते दि. 25 रोजी भक्ती स्थळ येथे वसुंधरारत्न, राष्ट्रसंत, परमपूज्य, सद्गुरु, डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज संजीवन समाधी शिवलिंग प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात धर्मपिठाच्या समारोप सोहळ्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंताचे उत्तर अधिकारी व वीरमठ संस्थांचे मठाधिपती परमपूज्य राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज हे होते. यावेळी धर्मपिठावर शिवा संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे, परमपूज्य निळकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वरकर, परमपूज्य प्रभूदेव शिवाचार्य महाराज माडेकर, शंकर लिंग शिवाचार्य महाराज शिरूर अनंतपाळकर, विरक्त मठाचे मठाधिपती संगणबसव महाराज येरटे, परमपूज्य महादेव शिवाचार्य महाराज कळमनुरीकर, परमपूज्य शाम्बुलिंग शिवाचार्य महाराज, भाजपाचे प्रदेशाचे प्रवक्ते गणेश दादा हाके, माजी आमदार बब्रुवाहन खंदाडे, आचार्य गुरुराज स्वामी महाराज, अभिषेक शिवाचार्य बुद्धि स्वामी मठ हडोळती, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक काका केंद्रे, माजी सभापती भारत चामे, माजी सभापती आयोध्या ताई केंद्रे, माजी नगराध्यक्षा अश्विनी कासणाळे, भक्ती स्थळाचे अध्यक्ष भगवंत बाबा पाटील चांभरगेकर, सचिव सुप्रियाताई गोटे पाटील, संयोजन समितीचे प्रमुख ओमप्रकाश पुणे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना म्हणाले की महात्मा बसवेश्वर यांचे कार्य महान असून त्याचप्रमाणे राष्ट्रसंतांचे कार्य सुद्धा महान असल्याचे सांगून येत्या काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मदतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन संतांच्या कार्याविषयी माहिती द्यावी असे सांगितले. बुद्धीपेक्षा डोळे अधिक महत्त्वाचे आहेत त्यामुळे तरुणांनी चांगले पाहून चांगलेच आचरण माऊलीप्रमाणे करावे असे जाहीर आवाहन केले.
यावेळी सोहळ्याचे अध्यक्ष उत्तर अधिकारी परमपूज्य राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज म्हणाले की, राष्ट्रसंतांचे जीवन त्यागाचे समर्पणाचे असून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याप्रमाणे ते लाहोर मध्ये शिक्षण घेऊन सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी ते अहमदपूरात स्थिर झाल्याचे सांगितले. आमच्या मठाचा वारसा ज्ञानाचा, त्यागाचा, वैराग्याचा असून जीवनभर राष्ट्रसंतांनी अंधश्रद्धा पाळली नाही. विवेक जागृत ठेवून त्यांनी विज्ञानासोबत अध्यात्माची जोड दिली असल्याचे सांगितले.
संजीवन समाधी शिवलिंग प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने भक्ती स्थळावर राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक भक्ती स्थळावर काढण्यात आली आणि दुपारी एक वाजता जन्म महोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रसंतांच्या समाधीवर गुलाल उधळण्यात आला.
केंद्रीय मंत्री नामदार भागवत कराड यांनी यांनी प्रथम राष्ट्रसंत च्या समाधी मंदिर गाभाऱ्यातील समाधीचे दर्शन घेऊन संजीवन समाधीवरील शिवलिंग प्राणप्रतिष्ठापना धार्मिक पूजा त्यांच्या हस्ते करण्यात आली.
प्रारंभी भक्ती स्थळाच्या वतीने भक्ती स्थळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
सोहळ्याचे प्रास्ताविक प्रा. मनोहर धोंडे यांनी सूत्रसंचालन रामलिंग तत्तापूरे यांनी तर आभार कपिल बिराजदार यांनी मांनले.
यावेळी दत्ता खंकरे, उमाकांत शेटे, विठ्ठल ताकबिडे, सुप्रिया गोटे, कपिल माकणे, आयोध्याताई केंद्रे, सी भ प भगवंतराव पाटील, सिद्धेश्वर पाटील, माजी आमदार बब्रुवाहन खंदाडे ,भाजपाचे प्रदेशाचे प्रवक्ते गणेश दादा हाके यांचे मनोगत पर तर गुरुवर्य शंकरलिंग शिवाचार्य महाराज, गुरुवर्य शंभुलिंग शिवाचार्य महाराज, गुरुवर्य निळकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वरकर यांचे धर्मावर प्रबोधन करणारे मार्गदर्शन पर भाषणे झाली . सोहळ्याचा समारोप राष्ट्रगीता नंतर
महाप्रसादाने करण्यात आला.
सोहळा यशस्वी करण्यासाठी भक्ती स्थळाची कोषाध्यक्ष सिद्धेश्वर पाटील, सदस्य शिवप्रसाद कोरे, एडवोकेट बाबुराव देशमुख, मनमत पालापुरे, धन्यकुमार शिवणकर, ऍडव्होकेट गंगाधर कोदळे, सौ शीला शेटकर, शिवकुमार उटगे, प्रा. धीरज शेटकार यांच्यासह संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.