भारतीय जनता पार्टीच्या वतीने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवतजी कराड यांचा अहमदपूर येथे सत्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : भारत सरकारचे केंद्रीय अर्थ व वित्त राज्यमंत्री ना. डॉ भागवतजी कराड यांचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने अहमदपूर येथे ऱ्हदयपुर्वक सत्कार करण्यात आला. अहमदपूर येथील डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज भक्तीस्थळावरील कार्यक्रम संपल्यानंतर केंद्रीय मंत्री भागवतजी कराड यांचा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा अहमदपूर विधानसभा प्रमुख गणेश दादा हाके पाटील व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अॅड. भारत भाऊ चामे यांच्या निवासस्थानी यथोचित सत्कार करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवतजी कराड यांच्या अहमदपूर येथील दौऱ्याच्या वेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, माजी आमदार बब्रूवान खंदाडे,माजी सभापती अशोक काका केंद्रे, जिल्हा सरचिटणीस अॅड. भारत भाऊ चामे, महीला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस रेखाताई तरडे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी, जिल्हा चिटणीस हणमंत देवकते, प्रदेश सदस्य बालासाहेब होळकर, तालुका अध्यक्ष प्रताप पाटील, तालुका सरचिटणीस माणिक नरवटे,शहराध्यक्ष सुशांत गुणाले,माजी उपसभापती बालाजी गुट्टे,अमरदिप हाके,चंदशेखर डांगे,अजिंक्य चामे रामनाथ पलमटे,संतोष कोटलवार,संजय माने, परमेश्वर आढाव यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.