शहरा अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे करा ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी !
अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर जिल्ह्यातील रस्त्यांचे लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रम केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भक्ती स्थळ अहमदपूर येथे संपन्न झाला यावेळी अहमदपूर-चाकूर शहरा अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याची मागणी भाजपा लातुर जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी केंद्रीय मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याविषयी सविस्तर माहीती अशी की, लातुर जिल्ह्यातील रस्त्यांचे लोकार्पण आणि भुमिपुजन कार्यक्रम केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भक्त स्थळ अहमदपूर येथे नुकताच पार पडला असुन अहमदपूर चाकूर शहरातील बाय पास ते बायपास पर्यंतच्या अंतर्गत रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती डांबरीकरण लेअर टाकून करण्यात आली आहे, परंतु येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने डांबरीकरण केलेला रस्ता हा दोन ते तीन महिन्यातच पूर्ववत स्थितीवर येत आहे, परिणामी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच सदरील रस्ता हा स्थानिक नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु येथील नगर परिषदेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने हा रस्ता सिमेंट काँक्रेटीकरण करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा निधी उपलब्ध होणार नाही. तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून लोहा जिल्हा नांदेड येथे शहरातील बाय पास ते बायपास पर्यंतचा अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रेटचा करून देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे अहमदपूर चाकूर शहरातील रस्ता सिमेंट काँक्रेट चा करून द्यावा तसेच मतदारसंघातील इतर उर्वरीत कामासंदर्भात भाजपा लातुर जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले लवकरच सबंधित सर्व कामांना मंजुरी मिळेल असे आश्वासन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिले.