सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल मध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा !!
अहमदपूर (गोविंद काळे) : दिनांक २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी संस्थेचे संचालक श्री. कुलदीप गणेशदादा हाके पाटील व संचालिका सौ. शिवालिका कुलदीप हाके पाटील उपस्थित होते. मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार वि. वा. शिरवाडकर ( कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी मराठी भाषेबद्दल तसेच कुसुमाग्रजांच्या जीवन चरित्रावर भाषणे केली. या दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये निबंध लेखन स्पर्धा, कविता वाचन स्पर्धा ही आयोजित केल्या होत्या. शाळेचे संस्थापक कुलदीप हाके पाटील यांनी विद्यार्थ्यांना कुसुमाग्रजांच्या जीवनावर माहिती दिली तसेच आपली मातृभाषा किती श्रेष्ठ आहे याचे महत्व पटवून दिले. प्रत्येकांनी आपल्या मातृभाषे बद्दल अभिमान बाळगावा व आपली मातृभाषा पुढील पिढीमध्ये रुजवावी असा संदेश दिला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. हर्षदा कदम यांनी केले तसेच आभार प्रदर्शन श्री. गणेश कोईलवाड यांनी केले. व कार्यक्रमाची सांगता “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी “ या मराठी भाषेचा गौरव करणाऱ्या सुंदर कवितेने झाली.