गावकरी सुखदुःख एकमेकात वाटायची, छोट्याशा गावात माणुसकी दाटायची.
जागल साहित्य संमेलनामध्ये रंगले निमंत्रितांचे कवी संमेलन
अहमदपूर (गोविंद काळे) : मराठी राजभाषा दिन विशेष अहमदपूर येथे दुसऱ्या जागल साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या कवी संमेलनामध्ये एकाहून एक सरस कविता सादर करत निमंत्रित कवींनी उपस्थितांना मंत्रमुक्त केले. या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. अनिल चवळे हे होते तर महेंद्र खंडागळे, दीपक बेले, रंजना गायकवाड, वर्षा लगडे माळी, सय्यद शहरात बेगम कामाक्षी पवार ,भागवत येनगे या कवींनी आपला सहभाग नोंदवला .या कवी संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन कवयित्री रंजना गायकवाड यांनी केले.
यावेळी महिंद्र खंडागळे यांनी आपली कविता अभंग स्वरूपात मांडताना
काय तो सोहळा वर्णावा कितीदा,
सावळा विठोबा मनी वसे .
ही कविता सादर केली
कवयित्री वर्षा लगडे माळी यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यावरील आपली कविता सादर केली.
कवी अनिल चवळे मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देताना निसर्गाशी नाते जोडणारी
गाव माझा नदीकाठचा किती सुंदर असायचा,
गावकरी सुखदुःख एकमेकात वाटायची
छोट्याशा गावात माणुसकी ही दाटायची
ही कविता सादर केली
कवयित्री रंजना गायकवाड यांनी
जग काट्याची ही बाग,
हे चातक झाले डोळे,
माये तू ये परतुनी.
ही कविता सादर करून उपस्थितांचे डोळे पाणावले
यावेळी कवी दीपक बेली यांनी आपली शेतकऱ्यावरील दमदार कविता सादर केली .कवयित्री कामाक्षी पवार यांनीही आपली सुंदरचना यावेळी श्रोत्या पुढे ठेवली तर कवी भागवत यांनी आपली गांधी ही कविता सादर केली.
तब्बल दीड तास या रंगलेल्या कवी संमेलनाचा निसर्गरम्य वातावरणात उपस्थित श्रोत्यांनी आनंद घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिलानी शेख सर तर आभार प्रा. गुरुनाथ चवळे यांनी मानले.
या कवी संमेलनास सत्यनारायण काळे, मोहिब कादरी ,प्राचार्य वसंत बिरादार, प्रशांत घाटोळ, राहुल घाटोळ ,प्राध्यापक मुंडे.
डॉक्टर चंद्रकांत उगिले. शिवाजी जाधव , श्रीराम कलमे, पांडुरंग पाटील,
प्राचार्य एन एस पाटील
प्राध्यापक नानासाहेब सूर्यवंशी
यांच्यासह श्रोत्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित लावली.