बसवराज पाटील, रश्मी बागल यांचा भाजपमध्ये प्रवेश
मुंबई : मराठवाड्यातील नेते बसवराज पाटील आणि सोलापुरातील ठाकरे गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी मंगळवार दि. २७ फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पक्ष(भाजप)मध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश मुंबईत पार पडला. यावेळी बसवराज पाटील म्हणाले, संपूर्ण देशामध्ये मोदींंच्या नेतृत्वात चांगल्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले आहे. विकसित भारत म्हणून आज मोदींच्या नेतृत्वाच वाटचाल सुरु आहे. आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. देशात त्यांच्यामागे मोठी शक्ती उभे करण्याचे काम आपल्याला करायचे आहे, त्यासाठी हा निर्णय घेतला. राज्यातील प्रत्येक घटकाला कसा न्याय देता येईल, यासाठी फडणवीस नेतृत्व करत आहेत. याच विचाराने मी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मी ४० वर्ष काँग्रेसमध्ये होतो. मी अतिशय प्रामाणिकपणे काम केले. आज त्याच निष्ठेने भाजपचे काम करत राहू. माझी कोणाबाबत तक्रार नाही, असे बसवराज पाटील यावेळी बोलताना म्हणाले. येत्या काळात पक्ष प्रवेशाचे बॉम्ब ब्लास्ट दिसतील. मोदींवर लोकांचा विश्वास आहे. येत्या काळात पक्ष प्रवेशाचे बॉम्ब ब्लास्ट दिसतील. महाराष्ट्राचा विश्वास मोदी आणि फडणवीस यांच्यावर आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यावेळी बोलताना म्हणाले.