आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्यू कॉलेज मध्ये स्वयंशासन दिन साजरी
लातूर (प्रतिनिधी) : आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्यू कॉलेज देवणी येथे विज्ञान दिनाचे औचित्य साधून अतिशय उत्साहात स्वयंशासन दिन साजरे करण्यात आले. इयत्ता दहावी वर्गांतील विद्यार्थ्यांना शालेय प्रशासनाचा अनुभव यावा, त्यांच्यात नेतृत्व गुण विकसित व्हावे म्हणून शाळेत संस्था अध्यक्ष मा. श्री गोविंदरावजी भोपणीकर साहेब व सचिव गजाननजी भोपणीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंशासन दिन हा उपक्रम राबविण्यात आले. स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक ओमकार घोडके यांच्या हस्ते आबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर उपमुख्याध्यापक अभिषेक खुळे यांच्या हस्ते सी व्हीं रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून विज्ञान दिवस साजरे करण्यात आले. यावेळी स्वतः विद्यार्थ्यानी मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापक , शिक्षक व सेवक ही पदे भूषविले.मुख्याध्यापक म्हणून ओमकार घोडके , उप मुख्याध्यापक अभिषेक खुळे , कृष्णा कुसणुरे, कृष्णा बिरादार, करण दुधभाते, प्रफुल कोरे, रोहिणी कोनाले, संकेत कांबळे, आदित्य लासोने, पार्थ दिवाण, ऋषीकेश माने, या विद्यार्थ्याने एक दिवसासाठीचे प्रशासन चालवले. त्याचप्रमाणे इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या वर्गावर जावून विषयाच्या तासिका घेतले . यामध्ये शाळेचे प्राचार्य राहुल बालुरे व उपप्राचार्य रामदास नागराळे, सुप्रिया कांबळे,लीड समन्वयक क्षेमानंद कन्नाडे यानी उत्कृष्ट नियोजन करून दिले व सर्व शिक्षकांनी आपापल्या विषयाची संबंधित विद्यार्थ्यांकडून चांगली तयारी करून घेतली . दुपारच्या सत्रात मी शिक्षक कसा झालो व काय अनुभव आले यावर विद्यार्थ्यानी मते मांडली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य राहुल बालूरे व प्रमुखं पाहूणे म्हणून उपप्राचार्य रामदास नागराळे, सुप्रिया कांबळे,लीड समन्वयक क्षेमानंद कन्नाडे हे उपस्थीत होते. याप्रसंगी सुत्रसंचलन भाग्यज्योती गुडडा तर आभार समीक्षा निवडगे या विद्यार्थिनींनी मानले.