अहमदपूर येथील भक्तीस्थळाला खा. सुधाकरराव श्रृंगारे यांच्या प्रयत्नातून 45 लक्ष निधी मंजूर
आचार्य गुरुराज स्वामी यांच्या हस्ते विकास कामाचे उदघाटन
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर शहरालगत असलेल्या मौजे गुगदळ शिवारातील राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज भक्तीस्थळाच्या विकासासाठी लोकप्रिय खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांनी 45 लक्ष रुपये मंजूर केले असून सदरील विकास कामाचे उदघाटन भक्तीस्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी यांच्या हस्ते आज विधीवत पुजन करून करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांनी भक्तीस्थळाला भेट दिल्या नंतर येथील विविध कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन भक्तीस्थळाच्या विश्वस्थाना दिले होते.
पर्यटन स्थळ विकास योजने अंतर्गत जिल्हा वार्षिक नियोजन मधून लोकप्रिय खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांनी 45 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन देलेले आश्वासन पूर्ण केल्याने राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या भक्तगणामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
सदरील विविध विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी भक्तीस्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी यांच्या सह पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. अयोध्याताई केंद्रे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अॅड. भारत भाऊ चामे, जिल्हा उपाध्यक्ष ओम भाऊ पुणे, धैर्यशील देशमुख, प्रदेश सदस्य बालासाहेब होळकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी, लोकसभा विस्तारक सिद्धेश्वर पवार,युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रामानंद मुंडे, विधानसभा विस्तारक चंदशेखर डांगे, संजय शिंदे, युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष शिवाजी श्रीमंगले, नागनाथ मुंडे,बांधकाम विभागाने शाखा अभियंता बाबा शेख, सुर्यकांत ढोबळे, सुशांत संगणगिरे यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे भक्तगण मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.