मेवापूर, चिंचोली येथे स्वीप कार्यक्रम अंतर्गत मतदार जागृती रॅली

0
मेवापूर, चिंचोली येथे स्वीप कार्यक्रम अंतर्गत मतदार जागृती रॅली

मेवापूर, चिंचोली येथे स्वीप कार्यक्रम अंतर्गत मतदार जागृती रॅली

अतनूर (एल.पी.उगीले) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रियेमध्ये जळकोट तालुक्यातील अतनूर परिसरातील व मेवापूर, चिंचोली मतदारांचा सहभाग आढावा, मतदारांना मतदानाचे महत्त्व व आवश्यकता यांची जाणीव व्हावी, यासाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने उदगीर विधानसभा मतदारसंघ (अनुसूचित जाती) अंतर्गत जळकोट तालुक्यातील अतनूर परिसरातील मेवापूर, चिंचोली येथे मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत येथे मतदार जागृती करण्यात आली. तलाठी अतिक शेख यांच्या नियोजनाखाली गावातील मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. तहसीलदार सौ.सुरेखा स्वामी यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व गावातील नागरिकांना आपला मतदानाचा अधिकार मतदानाच्या वेळी वापरण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अतनूर परिसरातील मेवापूर, चिंचोली येथे तलाठी अतिक शेख यांच्या पुढाकाराने मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. गावात मतदान करण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थी रॅली काढून गावात मतदानाबद्दल वातावरण निर्मिती करण्यात आली. येथे गटचर्चाही घडविण्यात आली. मतदानास अधिक अधिक प्रतिसाद मिळावा हा उद्देश सफल व्हावा. यासाठी तहसीलदार सौ.सुरेखा स्वामी, नायब तहसीलदार संतोष गुट्टे, नायब तहसीलदार जी.एल.खरात, मंडळ अधिकारी कमलाकर पन्हाळे, मंडळअधिकारी राजेंद्र कांबळे, लिपीक रऊफ शेख, डाटा ऑपरेटर अलीम शारवाले, सर्व बीएलओ, व तलाठीसह ग्राहक संरक्षण परिषदेचे शासन नियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, मेवापूरच्या सरपंच सौ.कोमल तुळशीदास पाटील, तुळशीदास पाटील, अमोल गायकवाड, मुख्याध्यापक नारायण पाटील, चिंचोलीचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील बाबूराव बेळकुंदे हेही परिश्रम घेत आहेत. तसेच त्यांना जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर, साधुराम ग्रामीण विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर, जिजामाता महिला मंडळ अतनूर, वसुंधरा महिला मंडळ सह विविध सेवाभावी संस्थेचे सहकार्य मिळत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *