“कृषि व कृषि उद्योग क्षेत्रातील नोकरी – व्यवसाय व स्वरोजगार संधी” कार्यशाळा संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : वसंतराव नाईक मराठवाङा कृषि विद्यापीठाशी संलग्नित कृषि महाविद्यालय ङोंगरशेळकी तांङा तालुका उदगीर येथे बी.एस्सी. कृषि पदवीच्या अंतिम सत्रातील ” अनुभवाधारित कौशल्य विकास ” अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी , शेतीपूरक ॲग्रीटेक आणि सर्विस प्रा.लि.वावर,पुणे व कृषि महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ” कृषि व कृषि उद्योग क्षेत्रातील नोकरी, व्यवसाय व स्वरोजगार संधी ” कार्यशाळेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले.
सुरुवातीस,महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष ङॉ. अंगदराव सुर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. अशोकराव पाटील यांनी शेतीपूरक ॲग्रीटेक आणि सर्विसेस प्रा . लि.वावर, पुणेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय शिरोङकर आणि तज्ञ मार्गदर्शक श्रीकांत शिंदे यांचे स्वागत केले आणि कार्यशाळेची रूपरेषा व प्रास्ताविक प्रा. सचिन खंङागळे यांनी केली.
प्रमुख तज्ञ मार्गदर्शक श्रीकांत शिंदे यांनी शेतीपूरक ॲग्रीटेक आणि सर्विसेस प्रा.लि.वावर, पुणे कंपनी संशोधित व निर्मित कृषीपूरक विविध उत्पादने , एकात्मिक पिक संरक्षणासाठी उपयुक्त अनेक रासायनिक व सेंद्रिय कीटकनाशके , बुरशीनाशके , संजीवके इत्यादींची सखोल माहीती देऊन,एकात्मिक पीक संरक्षण तंत्रज्ञान,सेंद्रिय खते व अन्नद्रव्ये याचे तांत्रिक मार्गदर्शन केले.तसेच , कृषी पदवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणा दरम्यान कौशल्य आत्मसात करून , कृषी उद्योग नोकरी, व्यवसाय स्वयंरोजगाराच्या व अनुषंगिक क्षेत्रातील उपलब्ध अमाप संधींचा शोध घेऊन सतत प्रयत्नशील राहावे. कृषि पदवीधरांनी कृषि क्षेत्रात कार्यरत राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा नामांकित खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये संधी प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी , प्राचार्य ङॉ. अंगदराव सुर्यवंशी यांनी, कृषी पदवीधरांसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अमाप संधी उपलब्ध आहेत.त्यासाठी स्वयंशिस्त, मेहनत,जिद्द व चिकाटी बाळगून, यापुढील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी उपस्थित विद्यार्थी,विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.विद्यार्थी समुपदेशन आणि प्लेसमेंट सेलचे अध्यक्ष प्रा. ङॉ. एस. एन वानोळे , सचिव प्रा. ङॉ. ङि. जी. पानपट्टे , प्रा. एस .आर. खंङागळे , प्रा. शितल पाटील , प्रा . डॉ. दिपाली कोकाटे,प्रा. डॉ. एस. एल. खटके , प्रा. ङॉ. वसीम शेख , बालाजी बिरादार इत्यादींनी सदरील कार्यशाळेचे यशस्वी नियोजन व आयोजन केले . या कार्यशाळेत , महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी,विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. अनिकेत नागलवडे या विद्यार्थ्यांने उपस्थितांचे आभार व्यक्त केले.